ETV Bharat / entertainment

'या राक्षसाला कठोर शिक्षेची गरज' रितेश देशमुखनं बदलापूर प्रकरणी मांडलं मत - badlapur case - BADLAPUR CASE

Riteish Deshmukh Reaction: अभिनेता रितेश देशमुखनं बदलापूरमधील घटनेनंतर एक पोस्ट शेअर केली होती. आता यावर यूजर्स प्रतिक्रिया देऊन दोषीला कठोर शिक्षा व्हावी याबद्दल मागणी करत आहेत.

Riteish Deshmukh Reaction:
रितेश देशमुखची प्रतिक्रिया (Actor Riteish Deshmukh (ANI photo))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 21, 2024, 3:00 PM IST

मुंबई - Riteish Deshmukh Reaction: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या 'बिग बॉस 5' चा होस्ट म्हणून चर्चेत आहेच. सामाजिक भान असलेला कलावंत अशी त्याची ओळख त्याने पुन्हा एकदा जपली आहे. त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यानं बदलापूरमध्ये झालेल्या मुलींबरोबर लैंगिक अत्याचारप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. रितेश प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत नेहमीच मांडत असतो. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे तो संतापलेला आहे. महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये दोन निष्पाप 4 वर्षांच्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रितेश देशमुख केला संताप व्यक्त : याप्रकरणी अनेकजण आता संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण देशातून होत आहे. दरम्यान, या घटविषयी रितेश देशमुखनं पोस्टमध्ये लिहिलं, "पालक म्हणून मी पूर्णपणे निराश, दुःखी आणि संतापलो आहे. शाळेतील पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यानं चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या घरांइतकीच सुरक्षित जागा असायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात गुन्हेगारांना जी शिक्षा दिली जात होती, चौरंग... तो कायदा आता पुन्हा लागू करण्याची गरज आहे." रितेशची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

यूजर्सनं दिल्या प्रतिक्रिया : या पोस्टवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं रितेशच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, "बदलापूर पीडित मुलीसाठी आवाज उठवा, मुलींच्या कुटुंबाला न्याय मिळावा." दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं " मी पण आई आहे, मला आधी स्वत:साठी भीती वाटत होती, आता माझ्या मुलींसाठी." आणखी एकानं लिहिलं, "शेवटी माणूस इतका क्रूर कसा असू शकतो? हे ऐकूनच आत्मा हादरतो." आता अनेकजण या पोस्टवर न्याय लवकर मिळावा यासाठी मागणी करताना दिसत आहेत. आजकाल या घटना खूप वाढल्यामुळे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. रितेश देशमुखनं त्याच्या लेडी लव्ह जेनेलियाला मजेदार व्हिडिओ शेअर करून दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ - genelia deshmukh birthday
  2. ऐकलंत का 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं, 'आला रे आला... भाऊचा धक्का'? - Bigg Boss Marathi
  3. रितेश देशमुखच्या 'पिल' वेबसिरीजची घोषणा, घातक औषध निर्मितीचा होणार रहस्यभेद - Riteish Deshmukh web series Pil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.