ETV Bharat / entertainment

खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान स्टारर शौना गौतमच्या दिग्दर्शकिय पदर्पणाचे शूटिंग संपले - Shauna Gautam directorial debu - SHAUNA GAUTAM DIRECTORIAL DEBU

Shauna Gautam directorial debu : खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांनी शौना गौतमच्या दिग्दर्शनातील पदार्पणच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. शौना गौतमने 12 वर्षांच्या स्वप्नानंतर आपल्या पहिल्या चित्रपटाचं काम संपवल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Shauna Gautam directorial debu
शौना गौतमच्या दिग्दर्शकिय पदर्पणाचे शूटिंग संपले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 5:03 PM IST

मुंबई - Shauna Gautam directorial debu : झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री खुशी कपूर आता नव्या चित्रपटात अभिनय साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. शौना गौतम दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या एका नवीन चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शनिवारी, दिग्दर्शिकेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्याचे जाहीर केलं आहे.

Shauna Gautam directorial debu
शौना गौतमच्या दिग्दर्शकिय पदर्पणाचे शूटिंग संपले

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये शौना गौतमने खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान यांच्यासह संपूर्ण कलाकार आणि 'क्रू' बरोबरचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शन तिन लिहिलंय, "माझ्या पहिल्या चित्रपटाचं शुटिंग संपलं....व्वाह. मी फक्त आभार मानू इच्छिते." खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका केकचा फोटो शेअर केला शेअर केला आहे, ज्यावर तिनं "इट्स अ रॅप" असे लिहिले आहे.

आगामी रोमँटिक कॉमेडीची निर्मिती करण जोहर करत आहे आणि त्याच्या कथा सांगण्याच्या स्टाईलमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता थेट ओटीटीवर रिलीज केला जाऊ शकतो अशी एक चर्चा आहे. असंही सांगितलं जातंय, की सुनील शेट्टी कलाकारांमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत सामील झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये भर पडली आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'संजू' यासारख्या बॉलिवूडच्या प्रॉडक्शनमधील चित्रपटांचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शौना गौतमनं काम केलंय.

दरम्यान, इब्राहिम अली खान स्वत:चा अभिनय प्रवास सुरू करत आहे आणि आगामी थ्रिलर चित्रपटात काजोल बरोबर काम करणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे खुशी कपूरने झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

हेही वाचा -

  1. प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE
  2. टायगर श्रॉफने उघडले सेलेब्रिटी फिटनेस सेंटर, एक्स दिशा पटानीनं लावली नव्या बॉयफ्रेंडबरोबर हजेरी - Tiger Shroff fitness center
  3. अजय देवगणनं 'मैदान'च्या रिलीजपूर्वी घेतला क्रिकेटचा आनंद , फोटो व्हायरल - maidaan Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.