ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज, पाहा व्हिडिओ - The Great Indian Kapil Show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनेक स्टार्स दिसत आहेत.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो ((Netflix - instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 4:47 PM IST

मुंबई- The Great Indian Kapil Show : कॉमेडियन कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'द्वारे प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देत आहे. या शोमध्ये आतापर्यंत बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील स्टार्स राजकुमार राव-जान्हवी कपूर कपिलबरोबर दिसत आहेत. याशिवाय प्रोमोमध्ये अनिल कपूरसह फराह खान आणि बाकी स्टार्स देखील धमाल करताना दिसत आहेत.'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या निर्मात्यांनी काल 17 मे रोजी एक ट्रेलर शेअर केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रोमो रिलीज : प्रोमोमध्ये कार्तिक आर्यनच्या बनावट लग्नाची आणि सानिया मिर्झा कपिल शर्माची खिल्ली उडवताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला, आंतरराष्ट्रीय गायक एड शिरन हा कपिलबरोबर दिसतोय. यानंतर कार्तिक या शोमध्ये त्याच्या आईबरोबर एंट्री करताना दिसतो. व्हायरल प्रोमोत अनिल कपूर आणि फराह खान कपिलबरोबर धमाल करताना दिसत आहेत. याशिवाय या प्रोमोमध्ये जान्हवी आणि राजकुमार राव त्याचा आगामी चित्रपट 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' प्रमोशनसाठी येताना दिसतात. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 31 मे रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय प्रोमोत राजकुमार कपिलच्या शोची प्रशंसा करताना दिसतो.

कपिल शर्माचं वर्कफ्रंट : यानंतर प्रोमोमध्ये रॅपर बादशाह काही गाणे गाताना दिसतो. सानिया नेहवाल, सानिया मिर्झा आणि मेरी कोम देखील कपिलबरोबर शोमध्ये मजा-मस्ती करत आहेत. या प्रोमोमध्ये येणाऱ्या पाहुण्याची झलक दाखवण्यात आली आहे. कपिलचा हा शो हिट झाला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' अनेकांना आवडत आहे. या शोच्या प्रोमोला अनेकजण पसंत करत आहेत. दरम्यान, कपिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच 'क्रू' या चित्रपटामध्ये तब्बू , करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉनबरोबर दिसला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलंय. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं केली आत्महत्या - CHANDU DIES BY SUICIDE
  2. सशस्त्र रक्षकांसह सलमान खानची एअरपोर्टवर एन्ट्री, जॅकलिन फर्नांडिस कान्सला रवाना - Salman Khan
  3. एक्स पती रितेश कुमारनं राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीबाबत केला धक्कादायक खुलासा - Rakhi Sawant

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.