ETV Bharat / entertainment

केरळमध्ये मोठ्या संख्येनं चाहत्यांच्या गर्दीनंतर थलपथी विजयच्या कारचं झालं नुकसान - Thalapathy Vijay car damaged

Thalapathy Vijay Car Damaged :'थलपथी' विजय 14 वर्षांनंतर 'गोट' चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये गेला होता. त्याला तिथे पाहण्यासाठी इतके चाहते जमले होते की, यामुळे त्याच्या कारचे नुकसान झाले आहे.

Thalapathy Vijay Car Damaged
थलपथी विजयच्या कारचे नुकसान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 2:52 PM IST

मुंबई -Thalapathy Vijay Car Damaged : साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय 14 वर्षांनंतर शूटिंगसाठी केरळला परतला आहे. विजयच्या चाहत्यांना ही बातमी कळताच त्याचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. विजय 18 मार्च रोजी शूटिंगसाठी केरळला पोहोचला होता. यावेळी विजयच्या चाहत्यांनी खूप गर्दी केली होती की त्याच्या गाडीचेही नुकसान झाले. आता सोशल मीडियावर विजयच्या कारचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या कारचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कारचा उजवा दरवाजा पूर्णपणे चपकला झाला आहे. दरवाजाची काच देखील कारच्या आतमध्ये पडून आहेत.

विजय कारचे नुकसान : कारच्या पुढील आणि मागील बाजूस चपलेल्या आहेत. आता विजय पूर्णपणे सुरक्षित असून तो आपल्या कामावर निघून गेल्याचं समजत आहे. विजयचे चाहते त्याचा आगामी चित्रपट 'गोट'साठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात विजय हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 'गोट'वर वेगानं काम सुरू असून चेन्नई ,श्रीलंका हैदराबाद ते थायलंडपर्यंत अनेक ठिकाणी चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले आहे. आता चित्रटाचे पुढचे शुटिंग केरळमध्ये होत आहे. विजयनं 2011 मध्ये केरळमध्ये 'कावलन' चित्रपटाचे शूटिंग केलं होतं. 'गोट' चित्रपटाचे शुटिंग केरळमध्ये होत असल्यामुळे त्याचे चाहते खूप खुश आहेत.

विजयचा 'गोट' चित्रपट : याआधी दिग्दर्शक व्यंकट प्रभू तिरुअनंतपुरमला लोकेशन व्हिजिटसाठी पोहोचले होते. तिरुवनंतपुरम ग्रीनफिल्ड स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ही चित्रपटाची शुटिंग करण्याचे ठिकाणे आहेत. 'गोट' चित्रपटामध्ये मीनाक्षी चौधरी प्रभुदेवा, प्रशांत, लैला, स्नेहा, जयराम, अजमल, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, वैभव आणि प्रेमजी अमरन यांच्याही भूमिका आहेत. 'लिओ'च्या प्रचंड यशानंतर विजयचा चित्रपट म्हणून 'गोट' हा सध्या कॉलिवुडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 'लिओ' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर तृषा कृष्णन, संजय दत्त. प्रिया आनंद, संती मयादेवी आणि इतर कलाकार दिसले होते.

हेही वाचा :

  1. Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज
  2. Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला लागली भूक, मागितला फ्री पिझ्झा
  3. एल्विश यादवच्या आईच्या डोळ्यात अश्रू ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.