ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'कडून शिकला सरकारनं धडा, तेलंगणात यापुढं पहाटे स्क्रिनिंगवर बंदी - TELANGANA BANS MORNING SHOWS

'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर यापुढं तेलंगणात मॉर्निंग शोवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Pushpa 2
'पुष्पा 2' ((Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 6, 2024, 3:32 PM IST

हैदराबाद - हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' च्या विशेष प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत एका रेवती नावाच्या महिलेचा दुःखद मृत्यू झाला होता. या गोंधळात रेवती आणि तिचा मुलगा तुडवला गेला. अनेकजण या घटनेत जखमीही झाले होते. रेवतीच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं समजतं. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाच्या टीमने मुलाला आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन दिलं आहे. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर यापुढं तेलंगणा राज्यात मध्य रात्री आणि पहाटे स्क्रिनिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

'पुष्पा' चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता हैदराबादच्या आरटीसी स्क्वेअर येथील संध्या थिएटरमध्ये पुष्पा-२ लाभ कार्यक्रमासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि रेवती (३५) नावाची महिला आणि तिचा मुलगा श्रतेज (९) या जमावाच्या पायात कोसळला. पोलिसांनी तात्काळ आई आणि मुलाला बाजूला घेऊन सीपीआर दिला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला, तर मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो व्हेंटिलेटरवर आहे.

मॉर्निंग शो रद्द करण्याची अधिकृत घोषणा तेलंगणा राज्य सरकारनं केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. तेलंगणात रिलीजच्या आधी पहाटेपासून स्क्रिनिंग सुरू करण्याची एक नवी पद्धत बऱ्याच काळापासून सुरू आहे. यासाठी मध्यरात्री 12 नंतर शो सुरू होतात. दिवसभरात एका थिएटरमध्ये नेहमी चार शो होत असतात. परंतु अशा खास दिवशी दिवसाला सात शोचं स्क्रिनिंग होत असतं. यासाठी लोक रात्रभर थिएटरच्या बाहेर उभं राहून गर्दी करतात. अशा चाहत्यांना भेटण्यासाठी त्यांचे स्टारही पोहोचतात. त्यामुळे उसळलेल्या गर्दीत अनेकदा अपघात घडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु राज्य सरकारनं अशा शोवर बंदी घालण्याचा निर्णय घेऊन अशा घटना रोखण्यासाठी एक ठाम पाऊल उचललं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.