ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'वर दिलं टी- सीरीजनं स्पष्टीकरण - टी सीरीजनं दिलं स्पष्टीकरण

T-Series And Aashiqui 3 : कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी अभिनीत आगामी चित्रपट 'आशिकी 3'बद्दल अपडेट आली आहे. टी-सीरीज 'आशिकी 3' भाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

T-Series  And Aashiqui 3
टी- सीरीज आणि आशिकी 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 1:58 PM IST

मुंबई - T-Series And Aashiqui 3 : अभिनेता 'आशिकी' आणि 'आशिकी 2' नंतर प्रेक्षक 'आशिकी 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आशिकी 3'साठी कार्तिक आर्यन आणि ॲनिमल फेम अभिनेत्री तृप्ती दिमरी या स्टार्सला साईन केलं आहे. आता या जोडीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. 'आशिकी 3'बाबत आता एक अपडेट समोर आली आहे. टी-सीरीजनं एक अधिकृत घोषणा केली आहे. टी-सीरीजनं 'आशिकी 3' चित्रपटाची निर्मिती करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'आशिकी 3' हा चित्रपट मुकेश भट्ट फिल्म्स आणि टी-सीरीजद्वारे निर्मित केला जाणार असल्याच्या बातम्या होत्या. मात्र आता टी-सीरीजनं 'आशिकी 3' चित्रपटाविषयीच्या या बातम्यांना अफवा ठरवलं आहे.

टी-सीरीज अधिकृत विधान : टी-सीरीजनं आपल्या 'आशिकी' फ्रँचायझीवरील अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आशिकी 3'च्या निर्मितीमध्ये आम्ही गुंतलेले नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. जर कधी' आशिकी 3' सुरू झाला, तर टी- सीरीज आणि विशेष फिल्म्स (मुकेश भट्ट) संयुक्तपणे फ्रँचायझीची निर्मिती करतील, 'आशिकी 3' टी-सीरीजद्वारे तयार केली जाणार असल्याच्या अफवांचे आम्ही पूर्णपणे खंडन करत आहोत. अनुराग बसू दिग्दर्शित 'आशिकी 3' किंवा 'आशिकी'चा आम्ही भाग नाही. आम्ही आमच्या चाहत्यांच्या उत्साहाची मनापासून प्रशंसा करतो. दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करू आणि आता आमच्या भागीदारांबरोबर आगामी प्रकल्पांचीही वाट पाहत आहोत.''

चांगले करण्यासाठी वचनबद्ध : 'आशिकी 3' या चित्रपटाशी संबंधित काही बातम्या रोज येत राहतात. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता आहे. रिपोर्ट्सनुसार, यात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय या चित्रपटात तृप्ती दिमरी जेनिफर विंगेट, फातिमा सना शेख आणि इतर कलाकार दिसणार आहे. दरम्यान 'आशिकी' हा चित्रपट 1990मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस 'ब्लॉकबस्टर' हिट होता. या चित्रपटामुळे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल रातोरात स्टार झाले. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिकी 2' या आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता तिसऱ्या भागाकडून देखील हीच अपेक्षा केली जात आहे. या म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगण स्टारर 'शैतान'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केलं उत्तम कलेक्शन
  2. ऑस्कर 2024 अवॉर्ड्स कधी आणि कुठे पाहू शकता, घ्या जाणून
  3. जान्हवी कपूरचा वाढदिवस: राम चरण स्टारर RC16 चित्रपटाच्या निर्मांत्यांकडून जान्हवी कपूरचे स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.