ETV Bharat / entertainment

बिग बॉस शोमधील नवीन कॅप्टन कोण असणार?, पाहा प्रोमो - बिग बॉस मराठी 5 - बिग बॉस मराठी 5

Bigg Boss Marathi 5 :'बिग बॉस मराठी 5' हा सध्या खूप जोमात सुरू आहे. आज 6 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना धमाकेदार गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे, यात सूरज हा घरातील नवीन कॅप्टन होताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 2:23 PM IST

मुंबई Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'च्या मागच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. यात अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर, आणि सूरज चव्हाण हे कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात. आता आगामी एपिसोडमध्ये घरातील नवा कॅप्टन कोण असणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. सध्या घराच्या कॅप्टन वर्षाताई आहेत. दरम्यान बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये 'गोलिगत' सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरातील नवीन कॅप्टन होणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'बिग बॉस मराठी 5' नवीन प्रोमो रिलीज : सूरज हा घरातील नवीन कॅप्टन झाल्यानं घरातील प्रत्येक सदस्य प्रोमोमध्ये खुश असल्याचं दिसत आहे. प्रोमोत सूरज मोठ्या प्रमाणात कल्ला करताना आणि त्याच्या खास शैलीमध्ये शर्टची कॉलर उडवताना दिसत आहे. बिग बॉस निर्मात्यांनी विशेष पद्धतीनं घरातील नवीन कॅप्टन घोषीत केला आहे. प्रोमोमध्ये असा ऑडिओ आहे की, "झापुक झुपूकचे ब्रँड अँम्बेसीडर, 'गोलिगत' आहे, ज्यांचं जिगर, सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरजभाऊ झाले आहेत कॅप्टन." त्यानंतर निक्की मोठ्यानं घोषाणा देते की, "हमारा कॅप्टन कैसा हो..." यानंतर घरातील बाकी सदस्य म्हणतात की, "सूरज चव्हाण जैसा हो." यानंतर सर्वजण मिळून सूरजबरोबर त्याच्या झापुक झुपूक स्टाइलमधील डान्स करताना दिसतात.

सूरजवर चाहते करत आहेत अभिनंदनाचा वर्षाव : व्हायरल झालेल्या प्रोमोला एक खास बॅनरही जोडण्यात आलं आहे. या बॅनरवर सूरजचं अभिनंदन करण्यात आलं आहे. यामध्ये शुभेच्छूक 'बी टीम, पिकनिक कट्टा' असं देखील आहे. सूरजसह बी टीममधील सर्व सदस्यांचे फोटोही या शुभेच्छांचा बॅनरवर लावण्यात आले आहेत. सूरज कॅप्टन झाल्याच्या प्रोमोवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, "भाऊ मन जिंकलं आणि बिग बॉस पण जिंकणार." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, "कधीच कुणाला कमी लेखू नये, सूरज जिंकला छान झालं." आणखी एकानं लिहिलं, "सूरज भाऊला गणपती बाप्पा पावले." याशिवाय 'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमनं कमेंट करत 'इशय हार्ड' असं लिहिलंय. आता घरात वेगळा बदल पाहायला मिळेल असं अनेकजण अंदाज लावताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी होणार जोरदार टक्कर, प्रोमो व्हायरल - Bigg Boss Marathi
  2. 'बिग बॉस मराठी 5'च्या नवीन टास्कमध्ये वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांच्यात झाली लढत - bigg boss marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घरातील नॉमिनेशन टास्कमुळे जान्हवी आणि घनश्यामध्ये होईल झुंज - bigg boss marathi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.