ETV Bharat / entertainment

आदर्श गौरव आणि शशांक अरोरा स्टारर 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव'चा ट्रेलर रिलीज - Superboys Of Malegaon Trailer out - SUPERBOYS OF MALEGAON TRAILER OUT

Superboys Of Malegaon Trailer : आदर्श गौरव, शशांक अरोरा आणि विनीत कुमार सिंग स्टारर आगामी 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' या चित्रपटाचा ट्रेलर 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Superboys Of Malegaon Trailer
सुपरबॉयज ऑफ मालेगाव (Superboys Of Malegaon Trailer: (Film poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 3:44 PM IST

मुंबई Superboys Of Malegaon Trailer : 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी, 6 सप्टेंबर रोजी ट्रेलर रिलीज केला आहे. रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटाची कहाणी खूप मजेदार आणि मनाला भिडणारी आहे. वरुण ग्रोव्हर यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये आदर्श गौरव, शशांक अरोरा, विनीत कुमार सिंग, अनुज सिंग दुहान, साकिब अयुब, पल्लव सिंग, मंजिरी पुपाला आणि मुस्कान जाफेरी यांच्या विशेष भूमिका आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी प्रॉडक्शन अंतर्गत रितेश सिधवानी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि रीमा कागती निर्मित, 'सुपरबॉयच ऑफ मालेगाव' महाराष्ट्रातील मालेगाव येथील नवोदित चित्रपट निर्माते नासिर शेखच्या वास्तविक जीवन कथेवर आधारित आहे.

ट्रेलर कसा आहे : 'सुपरबॉयच ऑफ मालेगाव'चा ट्रेलर मजेदार आणि भावनिक क्षणांनी भरलेला आहे. हा ट्रेलर नासिर आणि त्याच्या मालेगावमध्ये राहणाऱ्या खास मित्रांच्या ग्रुपच्या आयुष्यात घेऊन जातो. या छोट्या गावात मोठी स्वप्ने पाहणारी काही नवोदित मुले आहेत. नासिर चित्रपटाची निर्मिती करणार की नाही, या चित्रपटाच्या कहाणीत दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मालेगावमधील सुपरबॉयची मैत्री, चित्रपट निर्मिती आणि कधीही हार न मानणारी मुले, मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि अडथळ्यांवर मात करून त्यांची स्वप्ने सत्यात उतरवणाऱ्यांची सर्जनशीलता यामध्ये पाहायला मिळणार आहे.

'सुपरबॉयज ऑफ मालेगाव' कधी होणार प्रदर्शित : 'सुपरबॉयज ऑफ मालेगाव'चा वर्ल्ड प्रीमियर 13 सप्टेंबर रोजी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (TIFF) होणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवला जाईल. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. त्यानंतर प्राइम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये हा चित्रपट स्ट्रीम होईल. या चित्रपटाचा ट्रेलर हा आता चाहत्यांना खूप आवडत आहेत. ट्रेलरच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन या चित्रपटामधील स्टार कास्टचं कौतुक करताना दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.