मुंबई - Bramayugam trailer released: गेल्या काही वर्षांत मल्याळम चित्रपटांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. या भाषेतल्या चित्रपटांना 'पॅन इंडिया' स्तरावर लोकप्रियता मिळतेय. विशेषतः या चित्रपटांमधलं विषयवैविध्य प्रेक्षकांना भावतं. याच आश्वासक वातावरणात आणखी एक मल्याळम चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार मामूट्टी एका हॉरर चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव 'ब्रमायुगम' आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'ब्रमायुगम'चा ट्रेलर हा चित्रपट थरारक असल्याची साक्ष पटवून देणारा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मामूट्टी आपल्या वेगळ्या आणि नव्या व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कौतुक मिळवताना दिसणार आहे. 'ब्रमायुगम'चा ट्रेलर 2:38 मिनिटांचा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ब्रमायुगम' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज : मामूट्टी 'ब्रमायुगम' ट्रेलरच्या शेवटी म्हणतो, "हे 'ब्रमायुगम' आहे, कलियुगातील आणखी एक विकृत युग आहे." यानंतर तो भयानक पद्धतीने हसतो. मामूट्टीचं आश्चर्यकारक परिवर्तन ट्रेलरमध्ये पाहिलं जाऊ शकतं. 'ब्रमायुगम' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण हा ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत. 'ब्रमायुगम' चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल सदाशिवन यांनी केलंय. याआधीही राहुल यांनी 'भूतकालम' या हॉरर चित्रपट दिग्दर्शन केलं होतं. 'भूतकालम' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
'ब्रमायुगम' चित्रपट कधी होणार रिलीज : आता 'ब्रमायुगम' चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाची कहाणी 'हटके' असल्यानं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकजण देताना दिसतायत. 'ब्रमायुगम' 15 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'ब्रमायुगम' चित्रपटामध्ये मामूट्टी व्यतिरिक्त लीज अमलादा, अर्जुन अशोकन, सिद्धार्थ आणि इतर कलाकार दिसणार आहेत. मामूट्टीनं 2023 मध्ये 'कथल-द कोअर' आणि 'नानापकल नेराथु मायाक्कम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले आहेत. मामूट्टीला त्याच्या या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे येणाऱ्या काही दिवसांतच कळेल.
हेही वाचा :