मुंबई - Sonakshi sinha and zaheer iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केल्यानंतर हे जोडपे खूप चर्चेत आले होते. आता पुन्हा एका या जोडप्याबद्दलच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर दोघेही हनिमून एन्जॉय करत आहेत. मंगळवारी सोनाक्षीनं झहीरबरोबरचे स्विमिंग पूलमधील एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच झहीरनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सोनाक्षीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हसताना दिसत आहे. याशिवाय झहीरचं देखील हसणे यात ऐकू येत आहेत.
सोनाक्षी आणि झहीरनं शेअर केले फोटो आणि व्हिडिओ : हा व्हिडिओ शेअर करत झहीरनं यावर लिहिलं की, "ती माझ्यावर ओरडणार होती, पण मी तिला हसवले." सोनाक्षी आणि झहीर दोघेही लग्नानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. याआधी सोनाक्षी आपल्या कुटुंबाबरोबर फॅमिली डिनर गेली होती. यावेळी झहीर इक्बालच्या आई आणि वडिलांनं तिच सुंदर पद्धतीनं स्वागत केलं होतं. दरम्यान सोनाक्षी आणि झहीरनं नोंदणीकृत लग्न केलंय. सोनाक्षीच्या घरी हे लग्न पार पडले होते. यानंतर या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. लग्नाची नोंदणी झाली असली तरी त्याआधी शत्रुघ्न सिन्हा आणि त्याची पत्नी पूनम सिन्हानं कन्यादान केलं होतं.
सोनाक्षी सिन्हाचं लग्न : कन्यादानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता. दरम्यान सोनाक्षीच्या लग्नात तिचा भाऊ लव न आल्यानं सोशल मीडियावर हा विषय खूप चर्चेचा ठरला होता. यानंतर यावर अनेकांना लव काही कमेंट्स करून प्रश्न देखील विचारण्यात आले होते. नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या शत्रुघ्न सिन्हानी म्हटलं की, "मुलीचे लग्न झाल्याचा आनंद आहे. आपल्या मुलीला सुखी वैवाहिक जीवन जगताना पाहून त्यांना खूप बरे वाटत आहे. दरम्यान सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'हाऊसफुल्ल 5' आणि 'निकिता रॉय ॲन्ड द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :