मुंबई Sohail Khan: बॉलिवूड अभिनेता सोहेल खान रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. यावेळी त्याच्याबरोबर कथित गर्लफ्रेंड देखील दिसली. या मिस्ट्री गर्लबरोबर सोहेल हा डिनर डेटला गेला होता. सीमा सचदेवबरोबरचं 24 वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून सोहेलनं 2022मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर तो खूप चर्चेत आला होता. आता त्याच्या आयुष्यात प्रेमानं पुन्हा प्रवेश केला आहे. काल रात्री तो एका मिस्ट्री गर्लबरोबर स्पॉट झाल्यानंतर त्याच्या नात्याविषयी अनेक यूजर्स बोलताना दिसत आहेत. आता ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत.
सोहेलच्या आयुष्यात 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री : मंगळवारी सोहेल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये तो वांद्रे येथील रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होता. त्यावेळी त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, त्याच्या कारमध्ये बसलेली एक मिस्ट्री गर्ल होती. यावेळी दोघेही कॅज्युअल वेअरमध्ये दिसले. सोहेलनं राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि निळा डेनिम घातला होता, तर मिस्ट्री गर्लनं काळा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. आपल्या घटस्फोटाबाबत बोलताना सोहेलनं एका मुलाखतीत म्हटलं होतं , "जोपर्यंत नाते टिकेल आणि आनंदी आहात, तोपर्यंत नाते टिकवा, बिघडवू नका. कारण हीच वेळ असते, जेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना तुमच्यात येतात. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. जेव्हा तुम्ही नातेसंबंधातील आनंद गमावू शकता, तेव्हा परस्पर सहमतानं विभक्त होणं चांगलं आहे. "
सोहेलच्या व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रिया : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं, "आता सोहेल पण अरबाज खानप्रमाणे लग्न करणार आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "आता या लोकांना काही काम राहिलं नाही." सोहेल खान आणि सीमा सचदेव यांचं लग्न 1998 साली झालं. नेटफ्लिक्स रिॲलिटी शो 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सीमानं सोहेलबरोबरच्या घटस्फोटाबाबत मोकळेपणानं सांगितलं होतं. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत.
हेही वाचा :