ETV Bharat / entertainment

गायक अभिजीत भट्टाचार्यनं सलमान खानच्या हिट गाण्याबाबत केला धक्कादायक खुलासा - SINGER ABHIJEET BHATTACHARYA - SINGER ABHIJEET BHATTACHARYA

Abhijeet bhattacharya and Salman khan : सलमान खान अभिनीत असलेल्या गाण्याबद्दल गायक अभिजीत भट्टाचार्यनं एक खुलासा केला आहे. आता त्याच्या या विधानामुळे तो चर्चेत आला आहे.

Abhijeet bhattacharya and Salman khan
अभिजीत भट्टाचार्य आणि सलमान खान (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 8:45 PM IST

मुंबई Abhijeet bhattacharya and Salman khan : बॉलिवूडमध्ये अभिजीत भट्टाचार्यनं शाहरुख खानसाठी सर्वाधिक गाणी गायली आहेत. याशिवाय त्यानं सलमानसाठी दोन हिट गाणीही गायली आहेत. अभिजीतनं या दोन हिट गाण्यांबद्दल आता प्रतिक्रिया देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. एका मुलाखतीत अभिजीतनं म्हटलं, "माझ्यासाठी हे गाणे कधीही चांगले नव्हते. त्यामुळे त्यावर फक्त माझे नाव दिसते. हे गाणे माझे नाही. हे गाणे खूप दिवसांपासून हिट आहे. माझी गाणी हिट झाली आहेत, ते चित्रपट व्यावसायिकही हिट होईलच असे नाही. माझी गाणी क्लासिक झाली आहेत." अभिजीतनं गोविंदा स्टारर अनेक गाणे गायली आहेत.

अभिजीत भट्टाचार्यनं केला धक्कादायक खुलासा : अभिजीतनं पुढं सांगितलं, "डेव्हिड धवननं गोविंदाशिवाय कोणाबरोबर अगोदर काम केलं नव्हते. त्यामुळे 'जुडवा' चित्रपटात कोण आहे हे मला कोणी सांगितले नाही. दरम्यान एक पिक्चर बनवला जात आहे, त्यात सलमान खान आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं, मात्र मला याबद्दल कल्पना नव्हती." यानंतर मला गाण्याच्या रिकॉर्डिंगमध्ये म्हणण्यात आलं होतं की , "तुम्ही गोविंदाला मनात ठेवून का गाण गात आहे." यानंतर "मी गोविंदाला विचार करून का गातोय, असा प्रश्न मला देखील पडला. सुरुवातीला डेव्हिड धवन गोविंदाला 'जुडवा' या चित्रपटात कास्ट करणार होते, मात्र सलमान खानला या चित्रपटात घेण्यात आले."

अभिजीत भट्टाचार्यबद्दल : दरम्यान 'टन टना टन' हे गाणं अभिजीतनं गोविंदाला डोळ्यासमोर ठेवून गायलं होतं. याशिवाय त्यानं 'चुनरी चुनरी' गाणं देखील सलमान खानसाठी गायलं आहे. आपल्या कारकिर्दीत अभिजीत भट्टाचार्यनं 'चांद तारे तोड', 'बादशाह ओ बादशाह', 'तुम्हे जो मैने देखा', 'मैं खिलाडी तू अनाडी' यांसारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. अभिजीत रिॲलिटी शो 'एक से बढकर एक'च्या जजच्या पॅनेलमध्ये होता. तसेच तो 2009 मध्ये संगीत दिग्दर्शक, गायक बप्पी लाहिरी आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्याबरोबर 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमध्ये जज म्हणून दिसला होता. याशिवाय तो 'सारेगमप लिटिल चॅम्प्स बांगला'मध्ये देखील जज होता. अभिजीतनं 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये 6034 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

हेही वाचा :

  1. डेब्यू प्रोडक्शन 'क्रॅक'सह करोडो गमावल्यानंतर विद्युत जामवाल फ्रेंच सर्कसमध्ये झाला सामील - VIDYUT JAMMWAL
  2. 'बालिका वधू' फेम अविका गोरनं 'या' चित्रपटातून केलं होत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण - avika celebrating her birthday
  3. विराटच्या डोळ्यात पाणी आल्यावर मुलगी वाल्मिकाला काय सांगितलं? अनुष्का शर्मानं शेअर केली पोस्ट - Anushka Sharma Shares post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.