ETV Bharat / entertainment

'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA

Sikander Viral Photos: सलमान खान स्टारर 'सिकंदर' चित्रपटाचा पहिला शेड्यूल पूर्ण झालंय. काही फोटो 'सिकंदर'च्या सेटवरून व्हायरल झाले आहेत.

Sikander Viral Photos
सिकंदर व्हायरल फोटो (सलमान खान आणि रश्मिका मंदाना (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 1:38 PM IST

मुंबई - Sikander Viral Photos : अभिनेता सलमान खान आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिलं शेड्युल पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो सेटवरून घेण्यात आल्याचं समजतं आहे. व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये सलमान खानची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये तो धुरकट वातावरणात उभा असल्याचं दिसत आहे. या फोटोद्वारे चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स शूट करण्यात येणार असल्याचं समजत आहे. दुसरा फोटोत एक माणूस दिसत आहे, याची ओळख अद्याप झालेली नाही. तसेच आणखी एका फोटोमध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना एका महिला चाहतीबरोबर दिसत आहे.

सिकंदरचे शूटिंग पूर्ण : रिपोर्ट्सनुसार, मुंबईत 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल 1 जुलै रोजी संपले. वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे सलमान खानबरोबर मुख्य ॲक्शन सीक्वेन्ससह शूटिंग होईल. सलमान चित्रकूट मैदानावर अभिनेता प्रतीक बब्बरबरोबर एक महत्त्वाचा ॲक्शन सीन शूट करेल. यामध्ये विमान आणि विशेष सेटचादेखील समावेश असेल. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल शूटिंग 19 जूनपासून सुरू झाले होते. शूटिंगची सुरुवात सलमान खानच्या काही दृश्यांमधून झाली. हा सीन मुंबईत शूट करण्यात आला होता.

सलमान आणि रश्मिका करणार एकत्र काम : या चित्रपटाचा पहिला सीन 33,000 फूट उंचीवर एका विमानातून शूट करण्यात आला होता. 'सिकंदर' चित्रपटाची कथा निर्मात्यांनी गोपनीय ठेवली आहे. 2025च्या ईदला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही स्फोटक ॲक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अनेक चाहते सलमान आणि रश्मिकाला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. हे दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. सलमानचा व्हायरल होत असलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत. सलमानच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'पवन पुत्र भाईजान', 'इन्शाअल्लाह', 'वांटेड 2', 'नो एंट्री 2', 'किक 2' आणि 'दबंग 4' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा केला पार - kalki 2898 ad box office collection
  2. सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha
  3. अनंत अंबानीनं कृष्णा काली मातेला लग्नासाठी दिलं आमंत्रण, व्हिडिओ व्हायरल - Anant Ambani and Radhika Merchant

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.