ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' होणार 'या' दिवशी प्रदर्शित - Stree 2 night shows - STREE 2 NIGHT SHOWS

Stree 2: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत 'स्त्री 2' या चित्रपटाती रिलीज डेट बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होणार याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर...

Stree 2
स्त्री 2 ('स्त्री 2' (Movie Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 12:50 PM IST

मुंबई - Stree 2: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' रिलीजच्या जवळ आहे. 'स्त्री 2'च्या प्रस्तावित रिलीजला फक्त एक आठवडा उरला आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक अपडेट आली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. आता 'स्त्री 2' चित्रपट एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी नाईटला प्रदर्शित होणार आहे. 15 ऑगस्टला जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा ॲक्शन ड्रामा चित्रपट 'वेदा' आणि अक्षय कुमार, फरदीन खान, एमी वर्क, आदित्य सील, तापसी पन्नू, प्रज्ञा जैस्वाल, वाणी कपूर स्टारर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'खेल खेल में' रुपेरी पडद्यावर रिलीज होईल.

'स्त्री 2' रिलीजची तारीख बदलली? : 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी हे मोठं पाऊल उचललं आहे. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान आणि जिओ स्टुडिओनं चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्याबरोबर 14 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2' चित्रपटाचा नाईट शो आयोजित करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी, 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी त्यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'साठी देखील असंच केलं होतं. आता 'स्त्री 2' चित्रपटाचे मध्यरात्रीचे शोज ठेवले जातील. 'स्त्री 2'चे नाईट शोज 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. 14 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2'चा नाईट शो फक्त फॅन इव्हेंटद्वारे चालवण्याची तयारी सुरू आहे.

'स्त्री 2' चित्रपटाबद्दल : दरम्यान 'स्त्री 2'च्या निर्मात्यांनी अद्याप यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.' स्त्री 2'बद्दल सांगायचं झालं तर, यावेळी चंदेरीच्या लोकांना सरकटाचा राक्षस त्रास देईल. हा सरकटा स्त्रीचा कट्टर शत्रू असल्याचं पंकज त्रिपाठी ( रुद्र भैय्या)नं ट्रेलरमध्ये सांगितलं होतं. 'स्त्री 2'चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल सहा वर्षांनंतर या चित्रपटाचा भाग येत आहे. 'स्त्री 2' चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा त्यांच्या कॉमिक शैलीनं प्रेक्षकांचं मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'मधील 'तुम्हारे ही रहेंगे हम' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - stree 2 movie
  2. खऱ्या आयुष्यात 'स्त्री' लग्न कधी करणार? यावर श्रद्धा कपूरनं दिलं मिश्किल उत्तर - Shraddha Kapoor Marriage Plan
  3. 'स्त्री 2' ट्रेलर मध्ये दिसली 'सरकटा'ची दहशत, गावातील स्त्रीयांच्या जीवाला धोका - Stree 2 Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.