ETV Bharat / entertainment

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल - Shamita hospitalised - SHAMITA HOSPITALISED

Shamita Shetty Endometriosis: शिल्पा शेट्टीची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टीला एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये ती शस्त्रक्रियेसाठी तयार होताना दिसत आहे.

Shamita Shetty Endometriosis
शमिता शेट्टी एंडोमेट्रिओसिस (हॉस्पिटल में भर्ती शमिता शेट्टी(@shamitashetty_official Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 3:30 PM IST

मुंबई - Shamita Shetty Endometriosis : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीला एंडोमेट्रिओसिसचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज शमितानं 14 मे रोजी तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या आजाराबद्दल सांगताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, "तुम्हाला माहित आहे का की जवळपास 40% महिलांना एंडोमेट्रिओसिसचा त्रास होतो आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहिती नसते! मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे, माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वारती आणि डॉ. सुनीता बॅनर्जी यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्या वेदनांचे मूळ कारण शोधून काढले. आता हा आजार शस्त्रक्रियेनं काढून टाकण्यात आला आहे. मी चांगल्या आरोग्याची अपेक्षा करत आहे. मी आता बरी, निरोगी आणि शारीरिक वेदनांपासून मुक्त आहे" हा आजार गंभीर असून यावर दुर्लक्ष करू नये.

शमिता शेट्टीनं दिला स्त्रीयांना संदेश : व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीचा आवाज ऐकू येत आहे. शिल्पानं शमिताचा हा संदेश कॅमेऱ्यात कैद केला आहे. या पोस्टनंतर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण तिच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करेल." दुसऱ्या एकानं लिहिलं, "लवकर बरी हो शमिता आणि तब्येतीची काळजी घे." आणखी एकानं लिहिलं, "असे व्हिडिओ बनवत राहा पैसे यायला पाहिजे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? : एंडोमेट्रिओसिस ही एक वेदनादायक स्थिती आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. गर्भाशयाच्या अस्तरांसारखे ऊतक तुमच्या ओटीपोटात आणि पेल्विक क्षेत्राच्या बाहेर वाढू लागते, त्या स्थितीला एंडोमेट्रिओसिस म्हणतात. या आजारात वेदना आणि प्रजनन समस्या देखील होऊ शकते. दरम्यान शमिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं चित्रपटसृष्टीत 'मोहब्बतें' या चित्रपटातून पदार्पण केलं होत. आता शेवटी ती 'द टेनेंट'मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. 'हाऊसफुल 5'मध्ये अनिल कपूरच्या जागी दिसणार 'ॲनिमल' स्टार, वाचा सविस्तर - Anil walks out of Housefull 5
  2. मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल अनुष्का-विराटनं गिफ्ट पाठवून मानले पापाराझीचे आभार - anushka sharma
  3. रणबीर कपूर स्टारर 'रामायण'साठी करावी लागणार दीर्घ काळाची प्रतीक्षा, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड - Ranbir Kapoor starrer Ramayan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.