ETV Bharat / entertainment

शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty - SHILPA SHETTY

Shilpa Shetty Kanya Pujan: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं महाष्टमीला तिच्या घरी कन्यापूजा केली. या खास प्रसंगी तिनं मुलगी समिशाबरोबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shilpa Shetty Kanya Pujan
शिल्पा शेट्टी कन्या पूजन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Shilpa Shetty : देशात नवरात्रोत्सव जोरात सुरू असून प्रत्येक सणाप्रमाणे हा सणही मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीनं नुकतीच नवरात्री अष्टमी साजरी केली. शिल्पानं लाडकी मुलगी समिषाबरोबर 'कन्या पूजा' केली. आता तिनं आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मुलगी समिशाचे पाय धुत असून तिची पूजा करत आहे. याशिवाय तिनं तिच्या घरी कन्याभोजनाचं देखील आयोजन केलं आहे. कन्या पूजेचा व्हिडिओ शेअर करत शिल्पानं लिहिलं, 'आज अष्टमीच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात, आमची देवी समिशाबरोबर कन्या पूजेनं होत आहे. परात्पर देवी महागौरी सर्वांना समृद्धी, प्रेम आणि शांती देवो, जय माता दी.'

शिल्पा शेट्टीनं नवरात्री सण साजरा : आता शिल्पानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं,"समिशा खूपचं क्यूट दिसत आहे." दुसऱ्या एकानं लिहिल, "नवरात्रीच्या शुभेच्छा मॅडम, तुम्हाला महाष्टमी साजरी करताना पाहून आनंद झाला." आणखी एकानं लिहिलं, "माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर असो, खूप सुंदर पूजा केली आहे तुम्ही." याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. शिल्पा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या मुलीबरोबरचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

शिल्पा शेअर केला होता व्हिडिओ : अलीकडेच शिल्पानं एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती तिच्या घरच्या जिममध्ये वर्कआउट करताना दिसत होती. याशिवाय ती वर्कआउट करताना हनुमान चालीसा ऐकत असून मुलीबरोबर खेळत होती. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलं होतं, 'जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा, निरोगी राहा आनंदी राहा.'' तसेच शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अलीकडेच रोहित शेट्टीच्या ओटीटी डेब्यू 'इंडियन पोलीस फोर्स' काम केलं होतं. यामध्ये तिच्याबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार होते. याशिवाय ती पुढं 'केडी-द डेव्हिल'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर अमुलची क्रिएटिव्ह पोस्ट, परिणीतीनंही दिली दाद - Amar Singh Chamkila
  2. विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल' चीनमध्ये 20 हजार स्क्रिन्सवर होणार रिलीज - 12th fail
  3. आमिर खाननं त्याच्या फेक व्हिडिओविरोधात एफआयआर केली दाखल, निवेदनही केलं जारी - Aamir Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.