ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग सुरू, पोस्ट व्हायरल - sharvari wagh and alia bhatt - SHARVARI WAGH AND ALIA BHATT

Sharvari Wagh: आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. आता शर्वरी वाघनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शिव रवैल यांचं आभार मानले आहेत.

Sharvari Wagh
शर्वरी वाघ (शर्वरी वाघ (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 12:45 PM IST

मुंबई - Sharvari Wagh: अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन यांसारख्या दमदार अभिनेत्यांनंतर यशराज स्पाय युनिव्हर्सनं आता ॲक्शनच्या दुनियेत अभिनेत्रींना आणण्याचा निर्णय घेतला आहे. यशराज आपल्या बॅनरखाली आलिया भट्ट आणि शर्वरी वाघबरोबर 'अल्फा' हा पहिला फिमेल स्पाय ॲक्शन चित्रपट निर्मित करत आहे. आलिया आणि शर्वरीचा स्पाय ॲक्शन चित्रपट 'अल्फा'ची घोषणा आधीच करण्यात आली होती. दरम्यान नुकतीच आलिया भट्ट या चित्रपटाच्या शूटिंग सेटवर दिसली. 'अल्फा' चित्रपटात शर्वरी वाघ देखील दिसणार आहे. आज 30 जुलैपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

शर्वरी वाघ आणि आलिया भट्टचा चित्रपट : नुकतीच 100 कोटींची कमाई करणाऱ्या 'मुंज्या' चित्रपटातील शर्वरी वाघनं आज 30 जुलै रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंग सेटचा आहे. तिनं पोस्टमध्ये चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शिव रवैल यांचं आभार मानले आहेत. ही पोस्ट शेअर करत शर्वरीनं लिहिलं की, "यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही, आजपासून माझा 'अल्फा' प्रवास सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी यासाठी खूप तयारी केली आहे. तुमच्या विश्वासाबद्दल आदित्य सर आणि शिव रवैल यांना खूप धन्यवाद!"

आलियाचा शुटिेंग सेटवरुन फोटो व्हायरल : आलिया भट्टचे 'अल्फा'च्या सेटवरून अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, यामध्ये ती ॲक्शन अवतारात दिसली होती. तसेच 5 जुलै रोजी आदित्य चोप्रानं त्याच्या पहिल्या फिमेल लीडची घोषणा केली होती. या चित्रपटाचा एक टीझर देखील रिलीज करण्यात आला होता, यामध्ये आलिया भट्ट म्हणत होती, "सर्वात प्रथम, सर्वात वेगवान... सर्वात दुष्ट, जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर प्रत्येक शहरात एक जंगल आहे आणि 'अल्फा' या जंगलावर राज्य करतो." या टीझरमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांची नावंही दिसतात. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

  1. जॉन अब्राहम स्टारर 'वेदा'ला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्यानं निर्मात्यांचे धाबे दणाणले - John Abrahams Vedaa
  2. शर्वरी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग स्टारर चित्रपट 'मुंज्या' केलं जबरदस्त कलेक्शन - munjya box office collection day 1
  3. 'मुंज्या'मध्ये कटप्पा उर्फ सत्यराजचे समर्पण आणि प्रतिभा पाहून शर्वरी वाघ झाली आश्चर्यचकित - Sharwari Vagh

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.