मुंबई - अजय देवगण आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'शैतान' चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवार 8 मार्चपासून सुरू झालं. विकास बहल दिग्दर्शित हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उमटल्याचे त्यांच्या प्रतिक्रियावरुन जाणवलं होतं. यामध्ये आर माधवन खलनायकाच्या व्यक्तीरेखेत दिसल्यामुळे त्याच्या बद्दल आणि चित्रपटाबद्दलचीही उत्कंठा वाढली होती.
-
Shaitaan's genius has at last been revealed on the big screen! Now that the wait is over, it was well worth it! #Shaitaan
— sai punith (@saipunith86) March 8, 2024
शैतान pic.twitter.com/m6CVtiC8DR
प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिलेला 'शैतान' आता थिएटरमध्ये दाखल झालाय. प्रेक्षकांनी चित्रपट पाहून आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत. आर माधवनच्या अभिनयाने मन जिंकून 'शैतान'ला प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली आहे. खलनायक म्हणून त्याने आपल्या अभिनय क्षमतेनं सर्वांना चकित केलं आहे.
'शैतान' या सायकोलॉजिकल थ्रिलरचा पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या चित्रपटप्रेमींनी X वर आपले रिव्ह्यू दिले आहेत. एका सोशल युजरने लिहिले: "'शैतान' ची प्रतीक्षा संपली आणि पडद्यावर त्याला पाहणे थरारक होते." अजय देवगणचे कौतुक करताना एकानं लिहिलंय, मी या चित्रपटात चुका शोधण्याचा प्रयत्न केला पण मला एकही सापडली नाही. अजय देवगणचा हा चित्रपट दृष्यम 2 पेक्षाही ग्रेट आहे. चित्रपट नक्कीच सुपरहिट होणार आहे."
चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखांच एकानं कौतुक केलंय. त्यानं लिहिलंय, "जान्हवीच्या व्यक्तीरेखेनं शोमध्ये रंगत वाढवली आहे. चित्रपटाच्या ब्लॉक तुम्हाला थरारक अनुभव देतो. आर माधवनचा अभिनय तुम्हाला भितीचा अनुभव देतो. चित्रपटाची कथा उत्कृष्ट आहे आणि दिग्दर्शन अप्रतिम झालंय." अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक करताना हा एक सिनेमॅटिक रत्न असल्याचं म्हटलंय आणि चित्रपट आवर्जुन पाहण्याचं आवाहनही केलंय.
''शैतान' ' हा एक सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगणने मुलीच्या जीवाला धोका असलेल्या एका वडिलांची भूमिका साकारली आहे. आर माधवनने साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या मते यशस्वी ठरलाय. विशेष म्हणजे 25 वर्षानंतर अभिनय पदार्पण करणाऱ्या ज्योतिकाचे यशस्वी पुनरागमन झालंय. यापूर्वी ती 1997 मध्ये अक्षय खन्नाच्या बरोबर 'डोली सजा के रखना' या चित्रपटात दिसली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -