मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री गोळीबार झाला. तीन अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकीच्या नावाचा समावेश असून त्यांचं राजकारणी तसंच सेलिब्रिटींशी चांगले संबंध होते. तसंच बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळं सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षेत वाढ : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. याच बिश्नोई गँगनं अभिनेता सलमान खानलाही धमकी दिली होती. तसंच यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला होता. त्यामुळं आता सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून सलमानला घरात थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या : शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन अज्ञात हल्लेखोरांकडून बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालादेखील एक गोळी लागली. जखमी अवस्थेत बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -