ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star - KARTIK AARYAN FAVOURITE CO STAR

Kartik Aaryan Favourite Co Star : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'चंदू चॅम्पियन'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सारा अली खान आणि कियारा अडवाणी यांच्यापैकी कोणता को-स्टार त्याला आवडते, याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांन याहून वेगळंच उत्तर दिलं.

Kartik Aaryan Favourite Co Star
कार्तिक आर्यन आवडता को-स्टार (कार्तिक आर्यन (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 5:18 PM IST

मुंबई - Kartik Aaryan Favourite Co Star : अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी स्पोर्ट्स बायोग्राफिकल चित्रपट 'चंदू चॅम्पियन'साठी चर्चेत आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान कार्तिक आर्यन त्याच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं देश-विदेशात जोरदार प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत कार्तिक आर्यनला विचारण्यात आलं की, सारा अली खान आणि कियारा अडवाणी यांच्यापैकी कोणती को-स्टार त्याला आवडते, यावर कार्तिकनं एक सुंदर उत्तर दिलं.

कार्तिक आर्यननं केलं खुलासा : अभिनेत्री सारा अली खान कार्तिक आर्यनची एक्स गर्लफ्रेंड आहे. हे जोडपे 'लव्ह आज कल 2' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच दोघांचे ब्रेकअप झालं. यानंतर कार्तिक आर्यननं कियारा अडवाणीबरोबर 'भूल भुलैया 2' आणि 'सत्यप्रेम की कथा' या दोन चित्रपटात काम केलं. कार्तिकचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. दरम्यान कार्तिकला सारा आणि कियाराबद्दल विचारले असता, त्यानं म्हटलं, "हा खूप कठीण प्रश्न आहे, दोन्ही अभिनेत्री चांगल्या आहेत आणि जबरदस्त काम करतात, पण माझी आवडती विद्या बालनजी आहे."

वर्कफ्रंट : 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन 'भूल भुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालन त्याच्याबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटात कार्तिक आणि विद्या बालन व्यतिरिक्त तृप्ती डिमरी, राजपाल यादव, संजय मिश्रा, विनीत, माधुरी दीक्षित आणि इतर कलाकार दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, भुवन अरोरा, पलक लालवानी, राजपाल यादव, विजय राज, मनोज आनंद आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तो 'आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज - anil kapoor first look
  2. 'मुंज्या'मध्ये कटप्पा उर्फ सत्यराजचे समर्पण आणि प्रतिभा पाहून शर्वरी वाघ झाली आश्चर्यचकित - Sharwari Vagh
  3. 'हमारे बारह'च्या रिलीजवर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी - Hamare Baarah movie movie controversy

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.