मुंबई - 'Sam Bahadur' Filmfare Awards: 69वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 27 जानेवारीपासून सुरू झाला आहे. हा पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या सोहळ्यामधील पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली गेली आहेत. आता उर्वरित नावे आज म्हणजेच रविवार जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान 'सॅम बहादूर'नं तीन तांत्रिक श्रेणींमध्ये विजेतेपद पटकाविले असल्याचं समजत आहे. याशिवाय 'जवान'ला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स (व्हिज्युअल) आणि सर्वोत्कृष्ट ॲक्शनमुळे पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता अपारशक्ती खुराना आणि करिश्मा तन्ना यांनी शनिवारी गुजरातमध्ये 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन केलं.
६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील 'व्हॉट झुमका' या ट्रॅकमधील कामासाठी गणेश आचार्य यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. 'ट्वेल्थ फेल'नं सर्वोत्कृष्ट संपादनाची ट्रॉफी जिंकली आहे. 'ॲनिमल' आणि सॅम बहादूर' या चित्रपटाला संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइनचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय आज लोकप्रिय आणि समीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 चा प्रमुख कार्यक्रम 28 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान या सोहळ्याबद्दल अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.
69वा फिल्मफेअर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइन - सॅम बहादूरसाठी कुणाल शर्मा आणि 'ॲनिमल'साठी सिंक सिनेमा
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर - हर्षवर्धन रामेश्वर- ॲनिमल'
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे - 'सॅम बहादूर'
'जवान'साठी सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स- रेड चिलीज व्हीएफएक्स
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- जसकुंवर सिंग कोहली आणि विधू विनोद चोप्रा - 'ट्वेल्थ फेल'
सर्वोत्कृष्ट कॉश्च्यूम डिजाइन - सचिन लवळेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर- 'सॅम बहादूर'
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - अविनाश अरुण धावरे, - 'थ्री ऑफ अस'
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - गणेश आचार्य 'व्हॉट झुमका' - 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
सर्वोत्कृष्ट ॲक्शन - स्पिरो रझाटोस, एनेल अरासू, क्रेग मॅकक्रे, यानिक बेन, केचा खम्फाकडी सुनील रोड्रिग्स - 'जवान'
हेही वाचा :