ETV Bharat / entertainment

ॲटलीच्या मास ॲक्शन चित्रपटात सलमान खान आणि रजनीकांत दिसणार एकत्र - SALMAN KHAN AND RAJINIKANTH - SALMAN KHAN AND RAJINIKANTH

Salman Khan and Rajinikanth : सलमान खान आणि रजनीकांत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली करणार आहे.

Salman Khan and Rajinikanth
सलमान खान आणि रजनीकांत (रजनीकांत आणि सलमान (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 12:50 PM IST

मुंबई - Salman Khan and Rajinikanth : चित्रपटसृष्टीतून एक मोठी स्फोटक बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत हे पहिल्यांदाच घडणार आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली करणार आहे. शाहरुख खानच्या 'जवान'चं दिग्दर्शन ॲटलीनं केलं होत, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार ॲटलीच्या या चित्रपटात मास ॲक्शन असणार आहे. ॲटली सुरुवातीला हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनबरोबर बनवणार होता, मात्र फीच्या वादामुळे ॲटलीचा हा चित्रपट सलमान खानला मिळाला.

रजनीकांत आणि सलमान खान दिसणार एकत्र : अल्लू अर्जुननं हा चित्रपट सोडल्यानंतर सलमान खानचं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं होतं. अलीकडेच अशी बातमी आली होती की ॲटलीच्या मास ॲक्शन चित्रपटात रणवीर सिंग सलमान खानबरोबर ॲक्शन करताना दिसणार आहे. मात्र या चित्रपटात सलमान खानबरोबर रजनीकांत असणार आहे. ॲटलीच्या या चित्रपटात सलमान खान आणि रजनीकांत मास ॲक्शन करणार आहेत. आता या बातमीला निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही. सलमान खान आणि रजनीकांत एका चित्रपटात एकत्र आले तर ते भारतीय चित्रपट उद्योगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सहकार्य असेल.

सलमान खान करत आहे 'सिकंदर'ची शूटिंग : आजकाल सलमान खान मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये त्याचा आगामी मास ॲक्शन चित्रपट 'सिकंदर'चं शूटिंग करत आहे. आमिर खानबरोबर 'गजनी' हा सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकानं हा 'सिकंदर'ला बनवला आहे. 'सिकंदर' या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. या चित्रपटात सलमान खानबरोबर साऊथ ब्युटी रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. हा चित्रपट बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. 'सिकंदर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना बरीच वाट पाहावी लागणार आहे. रुपेरी पडद्यावर हा चित्रपट 2025मध्ये रिलीज होईल. याआधी चित्रपटाच्या सेट वरील काही फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो चाहत्यांना खूप आवडले होते.

हेही वाचा :

  1. 'तेरे मस्त मस्त दो नैन'वर थिरकले नवविवाहित सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल - Sonakshi Sinha wedding reception
  2. करण सिंग ग्रोव्हरनं दोन अयशस्वी घटस्फोटबद्दलचा केला खुलासा - karan singh grover breaks silence
  3. विवाहबंधनात अडकल्यानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची पहिली झलक आली समोर - Sonakshi And Zaheer Reception

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.