ETV Bharat / entertainment

"त्यानं आजपर्यंत कधी झुरळही मारलं नाही" : सलीम खाननं केली सलमानची पाठराखण

Salman Khan threat case : आपला मुलगा सलमान खान यानं काळवीट तर सोडाच पण कधी झुरळही मारलेलं नाही, असं सलमान खानच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 2 hours ago

Salman Khan threat case
सलमान आणि सलीम खान ((IANS))

मुंबई - सलमान खानचं काळवीट हत्या प्रकरण आणि त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईशी तयार झालेलं वैर दिवसेंदिवस गंभीर वळण घेत आहे. काळवीट प्रकरणी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गॅन्गकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी आपला मुलगा माफी मागणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितलं आहे. काल सलमान खानला नवी धमकी मिळाली असताना सलीम खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. या नव्या धमकीमध्ये लॉरेन्स बिश्नोईसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सलमान खानकडून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

सलमाननं कोणत्याही प्राण्याची हत्या केलेली नाही - सलीम खान

सलीम खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांच्या मुलाने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि तो माफी मागणार नाही. सलीम खान म्हणाले, "माझ्या मुलानं कधीही कोणत्याही प्राण्याची शिकार केली नाही, सलमान खानने आजपर्यंत कधी झुरळही मारलेलं नाही, आम्ही हिंसेवर विश्वास ठेवत नाही. लोकांना माहित आहे की आम्ही डाउन टू अर्थ लोक आहोत. लोक म्हणतात की तुम्ही नेहमी जमिनीकडे बघत चालता, मी त्यांना सांगतो की, आपल्याकडून पायाखाली किडाही मरु नये याची आम्ही काळजी घेतो. सलमानची एनजीओ 'बीइंग ह्युमन' अनेकांना मदत करत आहे, कोविडच्या दिवसात लांबच लांब रांगा लागल्या होत्या, कुणाला शस्त्रक्रिया करायची असेल तर अनेकजण मदतीला यायचे दररोज चारशेहून अधिक लोक मदतीसाठी येत होते."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानवर बिश्नोई समाजात देवाप्रमाणे पुजल्या जाणाऱ्या काळ्या हरणाची शिकार केल्याचा आरोप होता. ही शिकार होत असताना त्यावेळी सलमानच्या बरोबर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे बॉलिवूड कलाकारही होते, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी अनेकजणांवर पोलीस कारवाई झाली असून सलमानलाही या कारवाईचा फटका बसला होता.

हेही वाचा -

  1. नव्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर कडक फौजफाटा, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
  2. सलमान खानला मिळाली नवी धमकी, केली 5 कोटींची मागणी
  3. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्या असतानाही, सलमान खान सुरू ठेवणार 'सिकंदर'चे शूटिंग?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.