ETV Bharat / entertainment

करीना कपूर स्टारर 'द बकिंगहॅम मर्डर्स'मधील 'साडा प्यार टूट गया' गाणं झालं रिलीज, पाहा व्हिडिओ - Sada Pyaar Tut Gaya song - SADA PYAAR TUT GAYA SONG

Sada Pyaar Tut Gaya Song OUT: करीना कपूर खानच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा पहिला ट्रॅक 'साडा प्यार टूट गया' प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात करीना कपूरचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

Sada Pyaar Tut Gaya Song OUT
साडा प्यार टूट गया गाणं (द बकिंगहॅम मर्डर्स (Song Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 6:25 PM IST

मुंबई- Kareena Kapoor: अभिनेत्री करीना कपूर खानच्या थ्रिलर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा पहिला ट्रॅक 'साडा प्यार टूट गया' रिलीज करण्यात आला आहे. टीझर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. दरम्यान गाण्याच्या शीर्षकाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक त्याच्या रिलीजची वाट पाहत होते. करीना कपूर अभिनीत या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलंय. 'साडा प्यार टूट गया' गाण्यात करीना कपूर बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्याद्वारे तिच्या चारित्र्याचा संपूर्ण तपशील व्हिज्युअलमधून दर्शविण्यात आला आहे. या गाण्याला संगीत विकी मार्ले यांनी दिलं आहे.

'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा बहुप्रतीक्षित टीझर 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. या टीझरची सुरुवात एका थरारक दृश्यानं झाली होती, यानंतर करीना ही क्राइम मिस्ट्री सॉल्व करताना दिसते. या चित्रपटामध्ये करीना 'जस्मीत भामरा'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्ये करीना ही गुप्तहेरच्या पात्रात असून ती गुन्ह्यामागील हेतू तपासण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. 'द बकिंगहॅम मर्डर्स'च्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटामधील स्टारकास्ट : आता करीनाचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटात करीना व्यतिरिक्त ॲश टंडन, रणवीर ब्रार आणि किथ ॲलनसह अनेक कलाकार आहेत. असीम अरोरा, राघव राज कक्कर आणि कश्यप कपूर यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. यापूर्वी, 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाला ऑक्टोबर 2023मध्ये मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. करीना कपूर खानचा हा चित्रपट हंसल मेहतासोबतचा पहिला आहे आणि यात ती सहनिर्माती देखील आहे. दरम्यान करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  1. हेही वाचा :
  2. करीना कपूर स्टारर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - The Buckingham Murders
  3. आयुष्मान खुरानानं करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट नाकारला, आलं कारण समोर - Ayushmann and Meghna Gulzar
  4. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.