मुंबई - Riteish deshmukh and genelia d souza : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीरामाच्या मुर्तीचा अभिषेक सोहळा हा खूप चर्चेत होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून तर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.अभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशानं पाहिला. दरम्यान 20 एप्रिल रोजी बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा देशमुख हे त्यांची मुले राहिल आणि रियान यांच्यासह श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यानंतर या रितेशनं 21 एप्रिल रोजी अयोध्येतील राम मंदिरामधील एक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला होता.
रितेश देशमुखनं शेअर केले श्रीराम मंदिरातील फोटो : या फोटोमध्ये रितेशचं कुटुंब श्रीरामाचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. याशिवाय पुजारी यांनी रितेश-जेनेलियाला एक भेट वस्तू दिली. रितेशनं जेनेलियाबरोबर फोटो टॅग करत त्यानं या पोस्टवर लिहिलं, "तुझे नाव मंत्रांपेक्षा मोठे आहे... जय श्री राम! रामललाचे भव्य दर्शन घेऊन धन्य झालो." रितेश देशमुख आणि जेनेलियानं श्रीरामाची पूजा केली असून ते मंदिरात जवळपास 20 मिनिट थांबले. रितेश आणि जेनेलिया यांनी मंदिराचे पुजारी संतोष तिवारी यांचीही भेट घेतली, ज्यांनी बॉलिवूडच्या जोडप्याला रामनामी आणि चंदन प्रसादही दिला होता. आता सोशल मीडियावर सध्या रितेशनं शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहेत.
रितेशच्या चाहत्यानं केलं कौतुक : रितेशच्या या फोटोवर त्याचे चाहते कमेंट्स करून त्याच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. रितेश आणि जेनेलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सोनाक्षी सिन्हाबरोबर 'काकुडा', 'रेड 2' आणि 'विशफोट' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'काकुडा' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहेत. दुसरीकडे जेनेलिया ही 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख हा करत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट 2025मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती आगामी 'ज्युनिअर' चित्रपटामध्ये असेल.
हेही वाचा :
- रजनीकांत आणि नागार्जुन एकाच चित्रपटात झळकणार? 'थलायवर 171'च्या शीर्षक लॉन्चपूर्वी चर्चेला उधाण - Thalavar 171
- कॉन्सर्ट चालू असताना महिला फॅन झाली भावूक, गायक आतिफ अस्लमला मारली प्रेमाची मिठी - पाहा व्हिडिओ - atif aslam
- 'कल्की 2898 एडी'मधील नवीन प्रोमो रिलीज, अमिताभ बच्चन साकारणार अश्वत्थामाची भूमिका - amitabh bachchan