मुंबई - Rashmika Mandanna: साऊथची सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच तिनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती धनुष्यबाणाच्या खेळाचा आनंद लुटताना दिसत आहे. तिनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''किती मजेशीर दिवस''. याशिवाय तिनं यावर लाल रंगाचे हार्ट देखील पोस्ट केले आहेत. आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती लाल आणि पांढऱ्या रंगसंगतीचा क्रॉप टॉपसह निळा रंगाच्या डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं यावर सनग्लास लावला आहे.
रश्मिका मंदान्नानं शेअर केला व्हिडिओ : आता तिनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, ''आमची स्वतःची भारतीय वंडर वुमन.'' दुसऱ्या एका चाहत्याने ''क्यूटनेस ओव्हरलोडेड'' आणखी एकानं लिहिलं, ''रश्मिका ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकेल.'' याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. नुकताच रश्मिकानं तिचा 28 वा वाढदिवस यूएईमध्ये साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही फोटो आणि व्हिडिओ तिनं इन्स्टा स्टोरीवर शेअर केले होते. याशिवाय रश्मिकानं नुकतेच काही फोटो चाहत्याबरेबर शेअर केले आहेत. यामध्ये ती कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.
वर्कफ्रंट : रश्मिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'द गर्लफ्रेंड' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर रश्मिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज करण्यात आले होते. शेअर केलेल्या दोन्ही पोस्टरमध्ये रश्मिका साध्या लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रवींद्रन करत आहे. 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट थ्रिलर असणार आहे. 'द गर्लफ्रेंड' चित्रपट रुपेरी पडद्यावर तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही. रश्मिका 'द गर्लफ्रेंड' व्यतिरिक्त अल्लू अर्जुनबरोबर 'पुष्पा 2: द रुल'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती विकी कौशलबरोबर रुपेरी पडद्यावर 'छावा' या ॲक्शन-ड्रामा चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करताना दिसेल.
हेही वाचा :