ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगनं आदित्य धरबरोबर पुढच्या चित्रपटाची केली पुष्टी, स्टारकास्टचे चेहरे आले समोर - Ranveer Singh new movie - RANVEER SINGH NEW MOVIE

Ranveer Singh : रणवीर सिंग आणि 'उरी- सर्जिकल स्ट्राइक'चा दिग्दर्शक आदित्य धर हे दोघेही एकत्र काम करणार आहेत. रणवीर स्टारर या चित्रपटाचं नाव 'धुरंधर' असं आहे. आता या चित्रपटामधील अधिकृत स्टारकास्टचे चेहरे देखील समोर आले आहेत.

Ranveer Singh
रणवीर सिंग ((Film announcement poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 2:09 PM IST

मुंबई- Ranveer Singh :अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आज 27 जुलै रोजी 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरबरोबर त्याच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टबद्दल बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू होती. रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या प्रोजेक्टचं नाव 'धुरंधर' असल्याचं म्हटलं जात आहे. 'धुरंधर' हा एक मास ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. आज या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टवरून पडदा हटवण्यात आला आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे कलाकार दिसणार आहेत.

चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री : रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये आदित्यनं पत्नी यामी गौतमला कास्ट केलंय. 'धुरंधर' चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. दरम्यान रणवीर सिंगनं या प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करताना लिहिलं, "हे माझ्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी माझ्यासाठी खूप धीर धरला आणि या क्षणाची वाट पाहिली, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, मी तुम्हाला वचन देतो की, मी तुमच्यासाठी चांगला चित्रपट घेऊन येईल. याआधी, तुमच्या आशीर्वादानं, आम्ही एका नव्या सुरुवातीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत."

चित्रपटाचं शूटिंग : या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ आणि बी62 स्टुडिओ यांनी संयुक्तपणे केली आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या कहाणीबद्दल सांगायचं झालं तर, हा एक मिशन आधारित चित्रपट आहे, जो पाकिस्तानशी संबंधित आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंग या महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकते. भारतासह काही शूटिंग परदेशात देखील होणार आहे. आदित्य धरनं स्वत: या चित्रपटाचं लेखन केलंय. 'धुरंधर'चं बजेट 300 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल... - ranveer singh birthday
  2. अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा - akshay wishes birthday ranveer
  3. रणवीर सिंगनं कुटुंबासहित पाहिला 'कल्की 2898 एडी', पत्नी दीपिकाकरिता शेअर केली पोस्ट - ranveer singh and deepika padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.