मुंबई - Ranveer Deepika : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न सध्या खूप चर्चेत आहे. अनंत अंबानी 12 जुलै रोजी त्यांची बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटबरोबर लग्न करणार आहे. नुकताच अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा पार पडला. अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यामध्ये रणवीर सिंग त्याची गर्भवती पत्नी दीपिका पदुकोणबरोबर पोहोचला होता. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार किडचा मित्र ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी देखील या पार्टीला उपस्थित होता.
ओरीनं शेअर केला दीपिका पदुकोणबरोबरचा फोटो : ओरीनं अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यामधील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दीपिका पदुकोण जांभळ्या रंगाच्या ब्रॉड बॉर्डरच्या साडीमध्ये उभी असून तिच्या जवळ रणवीर आणि ओरी आहे. ओरीनं दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवला आणि सुंदर फोटो क्लिक केला आहे. ओरीनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये इन्फिनिटीचं चिन्ह शेअर केले आहे. आता ओरीच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं या पोस्टवर लिहिलं, "ओरी खूप लकी आहे, त्यानं बाळ होण्यापूर्वी त्याला हात लावला." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, "पती, पत्नी आणि ओरी." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "ओरी स्वामीचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
अनंत आणि राधिकाचं लग्न : 5 जुलै रोजी अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा झाला होता, यामध्ये मुकेश अंबानीनं फी म्हणून 83 कोटी रुपये पॉप गायक जस्टिन बीबरला नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी दिले होते. आता 12 जुलै रोजी अनंत अंबानींच्या लग्नाची मिरवणूक काढण्याची तयारी सुरू आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात जगातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या लग्नात अनेक बॉलिवूड स्टार्स धमाल करताना दिसतील. या जोडप्याचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे.
हेही वाचा :
- अनंत अंबानी - राधिका मर्चंटच्या हळदीमध्ये सलमान खान, रणवीर सिंगसह सिने स्टार्सनं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - Anant and Radhika wedding
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील जस्टिन बीबरनं शेअर केले खास फोटो आणि व्हिडिओ - Anant Radhika Sangeet Nigh
- अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY