मुंबई - Ramayan Shooting Video Leaked : 'ॲनिमल'च्या शानदार यशानंतर रणबीर कपूरनं आता त्याच्या मोस्ट अवेटेड 'रामायण' चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात रणबीर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. 'रामायण' चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी सर्वकाही गुप्त ठेवलं आहे. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'रामायण' चित्रपटाचा सेट दिसत आहे. लीक झालेल्या एका फुटेजमध्ये पुरातन काळाचे प्रदर्शन करण्यासाठी काही बांधकाम केलं जात आहे. सेटमध्ये अनेक खांब आणि लाकडी भिंती दिसत आहेत. याशिवाय राम, लक्ष्मण आणि सीताचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
'रामायण' चित्रपटाच्या सेटवरची फोटो लीक : मिळालेल्या माहितीनुसार 'रामायण'साठी 11 कोटी रुपयांचा अयोध्येचा सेट तयार करण्यात आला आहे. रणबीरला श्रीरामच्या लूकसाठी थ्रीडी स्कॅन करावे लागणार असल्याची बातमी आहे. रणबीर कपूरनं नितीश तिवारी यांच्या चित्रपटासाठी आवाज आणि उच्चारणाचे प्रशिक्षण घेत आहे. रामायणातील प्रत्येक ओळ सांगण्याची एक पद्धत आहे. रणबीरला उच्चारांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नाही. यासाठीच त्यानं प्रशिक्षण घेतल्याचं समजत आहे. या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साऊथ अभिनेत्री साई पल्लवीची निवड केली गेली आहे. याआधी आलिया या चित्रपटामध्ये सीता माताच्या भूमिकेत दिसणार होती. मात्र व्यग्र शेड्यूलमुळे तिनं या चित्रपटाला नाकारलं होतं.
पहिल्यांदाच रणबीर हा धार्मिक पात्रामध्ये दिसेल : 'रामायण' चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटामध्ये हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलचे नाव पुढे आले आहे. तर कुंभकरणच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला अप्रोच करण्यात आलं असल्याचं समजत आहे. मात्र या पात्रांबाबत कोणताही अधिकृत खुलासा निर्मात्यांनी केलेला नाही. रणबीरचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत. 'रामायण' चित्रपटामध्ये पहिल्यांदाच रणबीर हा धार्मिक पात्रामध्ये दिसणार आहे. रणबीरनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. दरम्यान रणबीरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'लव्ह अँन्ड वॉर' , 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- रणजीत यांनाही ऑफर झाली होती 'शोले'च्या गब्बरची भूमिका, मित्रासाठी दिला होता नकार - Sholay Gabbar Singh role
- 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यननं घेतली कठोर मेहनत, 14 महिने गिरवले मराठीचे धडे - KARTIK AARYAN
- 'जोकर 2'च्या ट्रेलर रिलीजची प्रतीक्षा संपली, जोक्विन आणि लेडी गागाचे नवीन पोस्टर जारी - Joker 2 sequel