मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ स्टारर रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट 'अजब प्रेम की गजब कहानी' पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी यांनी 'अजब प्रेम की गजब कहानी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. 'अजब प्रेम की गजब कहानी' चित्रपटामध्ये रणबीर कपूरनं (प्रेम) एका अष्टपैलू पात्राची भूमिका केली असून तो कतरिना कैफ (जेनी) या ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडतो. हा चित्रपट 2009 साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आज, मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी 'अजब प्रेम की गजब कहानी'च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या रि- रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होईल : टिप्सनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिलं, 'प्रेम आणि जेनीची प्रेमकथा साजरी करा, जी 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये परत येत आहे.' आता रणबीर आणि कतरिना कैफचे चाहते या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही यूजर्सनं लिहिलं आहे की, त्यांनी हा चित्रपट 2009 मध्ये थिएटरमध्ये पाहिला होता. आता पुन्हा एकदा त्यांना हा चित्रपट पाहताना मजा येईल. त्याचबरोबर काही युजर्सनी लिहिलं आहे की, या चित्रपटाची गाणी अतिशय अप्रतिम आहेत.
'या' चित्रपटांमध्ये कॅट आणि रणबीरची जोडी दिसली : 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट अवघ्या 25 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 133.73 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटानं पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर 23 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट हिट ठरला होता. यानंतर रणबीर आणि कतरिना कैफची जोडी 'राजनीती' (2010) आणि 'जग्गा जासूस' (2017) या चित्रपटांमध्ये दिसली होती. दरम्यान कतरिना कैफ शेवटी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात तर रणबीर कपूर मेगा ब्लॉकबस्टर 'ॲनिमल'मध्ये दिसला होता. आता पुढं तो 'ॲनिमल पार्क', 'लव्ह अँड वॉर' आणि 'रामायण'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :