ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाला एका महिना पूर्ण; शेअर केला व्हिडिओ - Rakul and Jackky - RAKUL AND JACKKY

Rakul and Jackky : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्तानं या जॅकीनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

Rakul and Jackky
रकुल आणि जॅकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 5:39 PM IST

मुंबई - Rakul and Jackky : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा गेल्या महिन्यात 21 फेब्रुवारीला विवाह झाला. आता लग्नाच्या एका महिन्यानंतर जॅकीनं फर्स्ट मंथ एनिवर्सरी साजरी करत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये या जॅकीनं एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर त्यानं लिहिलं, ''ज्या क्षणापासून आम्ही एकाच मार्गावरून चालत आलो, त्या क्षणापासून आम्ही एकमेकांचा हात धरून मिस्टर आणि मिसेस झालो आहोत.'' या प्रत्येक क्षणाला माझ्या मनात एक खास स्थान आहे. तुझ्याबरोबर एक महिना एका सेकंदासारखा गेला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. फर्स्ट मंथ एनिवर्सरीसाठी तुला शुभेच्छा.''

रकुल प्रीत सिंगची मुलाखत : एका मुलाखतीदरम्यान रकुल प्रीत सिंगनं म्हटलं होत की, ''ही पहिली होळी असेल जी आम्ही एकत्र साजरी करू.'' लग्नानंतरचे आयुष्य आणि त्यात आलेले बदल याबद्दल बोलताना तिनं पुढं म्हटलं, ''लग्नानंतर मला काहीही बदलण्याची गरज नव्हती, हा आयुष्याचा एक सुंदर भाग आहे जो कोणासाठीही सामान्य असू शकतो. लग्नानंतर आपलं आयुष्य बदलेल असा विचार करून लोक अनेकदा घाबरतात. पण लग्नापूर्वी आणि नंतर काही फरक झालेला नाही.'' यानंतर तिनं पुढं सांगितलं होत की, ''आम्ही दोघेही एकसारखे आहोत. जवळपास 90 टक्के आमच्यात साम्य आहे.''

वर्कफ्रंट : रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचं लग्न खूप चर्चेत होत. त्याच्या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर या जोडप्याला चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. लग्नानंतर या जोडप्यानं देखील काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्याबरोबर शेअर केले होते. आता नुकतेच या जोडप्यानं वृक्षरोपन केलं होतं. यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं रकुल जवळ फक्त हिंदी चित्रपटसृष्टीच नाही तर साऊथमधीलही अनेक प्रोजेक्ट्स आहेत. रकुल कमल हसनबरोबर 'इंडियन 2'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'जगथ जेंत्री'मध्ये झळकणार आहे. दुसरीकडे जॅकी भगनानी त्याचा आगामी ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

  1. ओटीटीवर सिक्वेल्सची रेलचेल, नव्या सीझनसाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला - sequels on OTT
  2. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' ओटीटीवर प्रदर्शित - Fighter OTT Release
  3. विद्या बालन आणि इलियाना डीक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार' टीझर रिलीज ; पाहा व्हिडिओ - Do Aur Do Pyaar Teaser OUT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.