ETV Bharat / entertainment

सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता कीर्तीनं रक्षाबंधननिमित्त शेअर व्हिडिओ, लिहिला भावनिक संदेश - Raksha Bandhan - RAKSHA BANDHAN

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता कीर्तीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेली ही पोस्ट खूप भावनिक आहे.

Raksha Bandhan 2024
रक्षाबंधन 2024 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 6:41 PM IST

मुंबई Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या निमित्तानं दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मोठी बहीण, श्वेता सिंह कीर्तीला तिच्या भावाची आठवण झाली आहे. तिनं आता इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सुशांतचे जुने फोटो आहेत. या व्हिडिओमध्ये सुशांत आणि त्याचे चाहते देखील दिसत आहेत. क्लिपचा शेवटी सुशांतच्या सोशल मीडिया पोस्टनं होते. यात लिहिलं आहे की, "कुठली गोष्ट कोणाला स्टार बनवते आणि योग्य माणूस, मला कधीच कळणार नाही." दरम्यान श्वेता सिंह कीर्तीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "रक्षाबंधनाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय भावा, तू केवळ एक महान कलाकारच नाही, तर एक महान माणूस देखील होतास. तू किती लोकांना प्रेमानं जिंकलं आहेस, मलाही तेच करायचं आहे आणि मी या गोष्टी फॉलो करत आहे."

श्वेता सिंह कीर्तीनं शेअर केला व्हिडिओ : श्वेतानं शेअर केलेल्या भावनिक पोस्टवर अनेकजण तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत सांत्वना देताना दिसत आहेत. याशिवाय श्वेतानं इन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये देखील एक नोट लिहिली आहे, यामध्ये तिनं लिहिलं, "माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आशा आहे की तू देवाच्या सहवासात नेहमी आनंदी आणि सुरक्षित असेल." 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्यानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. सुशांतचे वांद्रे येथील मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमध्ये असलेलं निवासस्थान आता 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मानं भाड्यानं घेतलं आहे.

सुशांत सिंहचे चित्रपट : सुशांतनं त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिका 'किस देश में है मेरा दिल'मधून केली होती. यानंतर त्यानं 'जरा नचके दिखा' आणि 'झलक दिखला जा 4' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं. 'पवित्र रिश्ता' या शोमधून तो प्रसिद्धीझोतात आला. यामध्ये त्यानं मानव नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती. या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अर्चनाची भूमिका साकारली होती. सुशांतनं अंकिताला डेट केलं होतं. या दोघांचं 2016 मध्ये नात तुटलं. सुशांतनं 2013 मध्ये अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काई पो चे!' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तो 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके', 'राबता'मध्येही दिसला. सुशांतनं 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये काम केल्यानंतर, त्याला बॉलिवूडमध्ये एक ओळख मिळाली. यानंतर तो 'सोनचिरिया', 'छिछोरे', 'ड्राइव्ह' आणि 'दिल बेचारा' सारख्या चित्रपटांमध्येही दिसला होता.

हेही वाचा :

  1. रक्षणाबंधनानिमित्त पाहा हे' सदाबहार चित्रपट, लाडका भाऊ-लाडका बहिणीमधील नाते होईल अधिक मजबूत - RAKSHA BANDHAN 2024
  2. कोलकाता बलात्कार खून प्रकरणानंतर अर्जुन कपूरनं रक्षाबंधननिमित्त पुरुषांना दिला संदेश - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.