ETV Bharat / entertainment

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीनं केलं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानबरोबर गुपचूप निकाह - Adil Khan Durrani Secret Marriage

Aadil Khan And Somi Khan: राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीनं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानबरोबर निकाह केला आहे. आता आदिलनं काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Aadil Khan And Somi Khan
आदिल खान आणि सोमी खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:28 AM IST

मुंबई - Aadil Khan And Somi Khan: राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीनं पुन्हा एकदा निकाह केला आहे. आदिलनं 'बिग बॉस 12' फेम सोमी खानबरोबर गुपचूप निकाह करून सर्वांनाचं एक आश्चर्याचा धक्का दिला. कुटुंबाच्या उपस्थित या जोडप्यानं म्हैसूर येथे विवाह केल्यानंतर आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आदिलला आता सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करताना दिसत आहेत. काही काळापूर्वी या जोडप्यानं दुबईत एक म्युझिक व्हिडिओ शूट केला होता, तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

आदिल खान दुर्रानी शेअर केली पोस्ट : याशिवाय या व्हिडिओत आदिल आणि सोमी त्यांच्या लग्नानंतरचा पहिल्या जुम्मा एकत्र घालवत असल्याची खुशी व्यक्त करत आहेत. सोमीची बहीण सबा खाननं देखील या जोडप्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दोघांना शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय आदिल खाननं काही फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत. या फोटोवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''अल्लाहच्या कृपेनं आम्ही आमचा निकाह एका साध्या पद्धतीनं पार पाडला असून हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही या आशीर्वादाबद्दल आभारी आहोत. आम्ही आमच्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे आभारी आहोत. पती-पत्नी या नात्याचा आमचा नवा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुखी वैवाहिक जीवनासाठी कृपया आपल्या प्रार्थनेत आमची आठवण ठेवा.''

दुसऱ्या निकाहमुळे आदिल खान दुर्रानी झाला ट्रोल : आदिलच्या या पोस्टवर एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, ''लग्न काही खेळ आहे का, जे कधी पण करायचं. काय काय पाहवं लागत आहे आता.'' दुसऱ्यानं लिहिलं, ''आता राखीच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.'' आणखी एकानं लिहिलं, ''राखी आता नक्की पोस्ट करेल मी तिच्या पोस्टची वाट पाहत आहे.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या जोडप्याला निकाहबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल
  2. आलिया भट्टची 'लिटल वुमन' राहाने तिच्यासाठी महिला दिन बनवला आणखीन खास
  3. 'शैतान' एक्स रिव्ह्यू: अजय, आर माधवनच्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? घ्या जाणून मते...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.