ETV Bharat / entertainment

राखी सावंत टॉवेल आउटफिटमध्ये कार्यक्रमात झाली सहभागी, युजर्सला आली मेट गालाची आठवण - RAKHI SAWANT - RAKHI SAWANT

Rakhi Sawant : राखी सावंतचा टॉवेल आउटफिटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत.

राखी सावंत
Rakhi Sawant ((VIRAL BHAYANI instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:11 PM IST

मुंबई Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आता पुन्हा एकदा तिच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आली आहे. ती अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. राखीनं चित्रपटांपासून तर छोट्या पडद्यापर्यंत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता सोशल मीडियावरही राखीचा प्रभाव खूप जास्त आहे. ती आपल्या स्टाईलनं लोकांना हसवण्याचं काम करते. आता ती तिच्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीनं मेट गालाच्या सौदर्यवान अभिनेत्री आणि उर्फी जावेदच्या स्टाइललाही मागं सोडलं आहे. तिच्या नवीन टॉवेल आउटफिटनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिचा टॉवेल ड्रेस लाल रंगाचा आहे. राखी हा ड्रेस घालून एका कार्यक्रमात गेली होती.

राखी सावंतचा नवीन लूक व्हायरल : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत राखीनं तिच्या डोक्यावर देखील टॉवेल गुंडाळला आहे. तसेच तिनं सिल्वर कलरचे बूट आणि काही दागिने घातले आहे. याशिवाय तिनं काही गुलाब देखील तिच्या ड्रेसला लावले आहे. आता या लूकमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राखीचा नवा लूक व्हायरल झाल्यानंतर तिला मेट गालामध्ये संधी मिळावी याबद्दल लोक म्हणत आहे. एका व्हिडिओमध्ये राखी गमतीनं म्हणते की अशा प्रकारची फॅशन आणणारी ती पहिली व्यक्ती आहे. ती कोणाचीही कॉपी करत नसल्याचं तिनं सांगितलं आहे. आता राखीच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. राखीला काहीजण मूर्ख असल्याचं म्हणत आहे.

राखी सावंतचं वैयक्तिक आयुष्य : राखी सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. ती बऱ्याच दिवसांनी दुबईहून परतली आहे. एकीकडे तिला आदिल दुर्रानीपासून घटस्फोट मिळालेला नाही. याप्रकरणी तिचा सध्या वाद सुरू आहेत, तर दुसरीकडे ती सध्या तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमारबरोबर जास्त वेळ घालवत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलीकडेच राखीनं सांगितलं होतं की, रितेश पुन्हा एकदा कठीण काळात तिच्या पाठीशी उभा आहे. याशिवाय दोघेही चांगले मित्र असल्याचं तिनं सांगितलं आहे. इतकेच नाही तर राखीनं असेही म्हटलं की, देवानंतर ती तिच्या आयुष्यात, ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मानते तो रितेश आहे. राखी सावंत शेवटी 'बिग बॉस मराठी' मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे निधन, रस्ता अपघातात जागीच मृत्यू - Pavitra Jayaram passed away
  2. आलिया भट्ट आणि विकी कौशल कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला झाले रवाना, व्हिडिओ व्हायरल - Alia Bhatt and Vicky Kaushal
  3. सलमान खान 'बिग बॉस ओटीटी 3'चं होस्टिंग चुकवण्याची शक्यता, करण जोहरसह काही स्टार्सची नावे आले समोर - salman khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.