ETV Bharat / entertainment

राजकुमार राव स्टारर श्रीकांत बोला बायोपिकचं नवं शीर्षक ठरलं, रिलीजची तारीखही जाहीर - Srikanth Bolla Biopic New Title

राजकुमार राव स्टारर श्रीकांत बोल्ला बायोपिकला नवीन शीर्षक मिळालं आहे. यापूर्वी 'श्री' असं नाव असलेल्या बायोपिकचं नाव आता 'श्रीकांत' असणार आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित हा चित्रपट 10 मे रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

Srikanth Bolla Biopic New Title
श्रीकांत बोला बायोपिकचं नवं शीर्षक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 2:54 PM IST

मुंबई - राजकुमार राव आगामी 'श्रीकांत - आ रहा है सबकी आँखे खोलने' या चित्रपटात उद्योगपती श्रीकांत बोल्लांचा उल्लेखनीय प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचं पूर्वी 'श्री' असं शीर्षक ठरलं होतं. नव्या शीर्षकासह हा चित्रपट अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 10 मे रोजी रिलीज होणार आहे. तुषार हिरानंदानी यांना 'सांड की आंख'च्या दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं. 'श्रीकांत' या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्याही भूमिका असणार आहेत.

हा चरित्रात्मक नाट्यमय चित्रपट श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहे. दृष्टिहीन असूनही, धैर्यानं श्रीकांत बोल्ला यांनी आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा केला आणि बोलंट इंडस्ट्रीजची यशस्वी स्थापना केली.

शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आणि अंध असलेल्या श्रीकांत यांनी 2012 मध्ये रतन टाटा यांच्या पाठिंब्यानं आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी बोलंट इंडस्ट्रीजच्या वतीनं सुपारी आणि रिसायकलिंग होऊ शकेल अशा पर्यावरणास अनुकूल उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि अपंग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली. कंपनीच्यावतीनं बनवण्यात येणाऱ्या उत्पादनामध्ये रिसायकलिंग केलेले क्राफ्ट पेपर, पॅकेजिंग आयटम, डिस्पोजेबल वस्तू आणि रिसायकलिंग केलेली प्लास्टिक उत्पादने यांचा समावेश आहे.

जन्मापासूनच संकटांचा सामना करण्यापासून ते इयत्ता 10 वी नंतर विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देण्यापर्यंत, श्रीकांत यांचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. तरीही आपल्या उदात्त महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर यूएसए मधील प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी पहिला दृष्टीहीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून लोकिक मिळवला.

गुलशन कुमार आणि टी सिरीज द्वारे समर्थित आगामी 'श्रीकांत - आ रहा है सबकी आँखे खोलने' हा चित्रपट टी सिरीज फिल्म्स आणि चक एन चीज फिल्म्स प्रॉडक्शन एलएलपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारर म्युझिक अल्बम 'ला पिला दे शराब' फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - ankita lokhande and vicky jain
  2. चमकीला ट्रेलर लाँचमधील परफॉर्मन्स पाहून काही जण परिणीतीला म्हणाले, 'आज गाने की जिद्द ना करो' - Parineeti Chopra Singing
  3. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील खलनायकाचा लूक आला समोर , पाहा पोस्टर - prithviraj sukumaran

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.