मुंबई - 'जेलर' चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर, सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे चित्रपटांची एक मनोरंजक लीस्ट तयार आहे. सध्या रजनीकांत टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित 'वेट्टयान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला असताना. तो दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबत आगामी चित्रपटात काम करणार आहे. दरम्यान, रजनीकांतने बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवालासोबत भागीदारी केल्याची एक बातमी आहे.
ते दोघे मिळून कोणत्या नव्या प्रोजक्टवर काम सुरू करणार आहेत याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु दोघांतील दोघात एकत्र काम करण्याबाबत ठरले असल्याचे समजते. साजिद नाडियाडवालाने त्याच्या X वर रजनीकांत बरोबरचा स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, "प्रख्यात रजनीकांत सरांसोबत सहयोग करणे हा खरा सन्मान आहे! आम्ही एकत्र या अविस्मरणीय प्रवासाची तयारी करत असताना अपेक्षा वाढत आहे! " असे नाडियाडवालाने लिहिलंय.
साजिद नाडियादवाला यांच्या पत्नी वार्डा एस नाडियाडवाला यांनी या विशेष दिवसानिमित्त रजनीकांतचे अभिनंदन केले, "तुमचे चिरंतन प्रेम आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे!" असे म्हटलंय.
दरम्यान, रजनीकांत लवकरच 'वेट्टयान'च्या शूटिंगचे अंतिम शेड्यूल पूर्ण करणार आहे आणि दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्यासोबत त्याचा आगामी चित्रपट सुरू करणार आहे. या चित्रपटाचे तात्पुरते नाव आहे 'थलाइवा 171' असे ठरवण्यात आलंय. 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'लाल सलाम 'या स्पोर्ट्स ड्रामामध्ये तो शेवटचा दिसला होता. या चित्रपटात अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत, यामध्ये रजनीकांत दीर्घ कॅमिओ भूमिका करत आहेत.
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मूळत: जानेवारीमध्ये पोंगल सणादरम्यान प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर त्याचे रिलीज फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. दुसरीकडे, साजिद नाडियादवाला हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपट उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटची स्थापना केली आणि या उपक्रमांतर्गत अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. त्याने 'किक', 'हाऊसफुल मालिका', 'जुडवा २' आणि इतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो लवकरच 'चंदू चॅम्पियन' आणि 'हाउसफुल 5' रिलीज करणार आहे.
हेही वाचा -