ETV Bharat / entertainment

राधिका मदनने शेअर केला 'सरफिरा'मधील राणी म्हात्रेच्या भूमिकेच्या प्रवासाचा खुलासा - Radhika Madan Interview - RADHIKA MADAN INTERVIEW

Radhika Madan Interview : राधिका मदनच्या 'सरफिरा'तील भूमिकेचं कौतुक होत आहे. अक्षय कुमारबरोबर काम केल्याचा अनुभव यानिमित्तानं तिच्या गाठीशी आला. चित्रपटाच्या सेटवरील, भूमिकेबद्दल आणि एकूण चित्रपटाच्या प्रवासातील अनुभव तिनं सांगितले आहेत.

Radhika Madan
राधिका मदन (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Radhika Madan Interview : बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदन तिच्या अलीकडील रिलीज झालेल्या 'सरफिरा' चित्रपटातील भूमिकेमुळं सध्या खूप चर्चेत आली आहे. यामध्ये ती अक्षय कुमार याच्या बरोबर स्क्रिन स्पेस शेअर करत होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारताच्या भरभराटीच्या स्टार्टअप संस्कृती आणि विमान वाहतूक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर एक आकर्षक कथा असल्याचं यापूर्वीच सिद्ध झालं आहे.

राधिका मदननं अलीकडेच एएनआयशी या चित्रपटातील तिची भूमिका, अभिनय प्रवास आणि अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव याबद्दल सांगितलं. राधिका मदनसाठी अभिनय हा अजिबात नसलेले अनुभव शोधण्याचा एक उत्तम मार्ग मिळाला आहे. ती म्हणाली, "मला वाटतं की अपूर्ण राहिलेली सर्व स्वप्नं मी माझ्या व्यक्तीरेखातून पूर्ण करू शकते. जसं की, मी कॉलेजमध्ये गेले नव्हते. मी 17-18 वर्षांची असताना काम करायला सुरुवात केली. कॉलेज पूर्ण केलं नाही त्यामुळं जेव्हा मी 'इंग्रजी मेडीयम' चित्रपट करत होते, तेव्हा मी ते स्वप्न देखील पूर्ण केलं."

'सरफिरा'मधील तिच्या भूमिकेच्या तयारीसाठी तिनं मराठी बोलीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी खूप प्रशिक्षण घेतलं होतं, असंही तिनं उघड केलं. "आम्ही मराठी शिकण्यासाठी चांगले २-३ महिने मराठीचे वर्ग घेतले, मी मराठी गाणी ऐकली, त्यांची देहबोली शिकली; शिवाय एक स्थानिक सलून आहे, ते तिथं फक्त मराठी बोलतात, म्हणून मी तिथे नेल सर्व्हिसेस किंवा तत्सम काही सेवा घेण्यासाठी जायचे.."

तिच्या भूमिकेशी असलेल्या तिच्या नातेसंबंधाविषयी बोलताना ती म्हणाली, "राणी ही एक व्यक्तिरेखा अतिशय धडधाकट, बिनधास्त आणि स्वतंत्र आहे. तिच्यातील या गुणांनी मला आकर्षित केलं. मी एक अभिनेत्री बनले कारण मला एकाच आयुष्याचा सहज कंटाळा येतो, मला असे काहीतरी करायचे होतं. हे काम मला खूप आव्हान देतं."

तिच्या सहकलाकार अक्षय कुमारबद्दल बोलताना राधिका मदनने सेटवरील त्याच्या व्यावसायिकतेची आणि समर्पणाची प्रशंसा केली, "तो एक परिपूर्ण प्रोफेशनल आहे आणि मला त्याच्याबद्दलचा हा गुण आवडतो. आम्ही पडद्यावर उत्तम केमिस्ट्री शेअर केली."

अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना तिनं सेटवर तिच्या पहाटे कॉल टाइमबद्दलचा एक किस्साही शेअर केला. ती म्हणाली, "मी सकाळी 4 च्या कॉल टाइमच्या आधी 3:50 वाजता माझ्या व्हॅनिटीमध्ये प्रवेश केला आणि एक एडी धावत आला आणि म्हणाला, लवकर तयार हो. मी म्हणाले, मी लवकर का तयार होऊ? मी कॉल टाईमच्या आधी आलो आहे. तर तो म्हणाला, अहो तसं नाही, तुमच्या आधी 3: 30 वाजताच अक्षय सर आले आहेत. मग माझ्या लक्षात आलं की मी कितीही प्रोफेशनल असण्याचा आव आणला तरी मी त्यांच्यापेक्षा काही पावलं मागेच आहे.", असं ती म्हणाली.

राधिका मदाननं तिच्या आगामी प्रकल्पांबद्दल तपशील शेअर केला. तिने तिच्या आगामी चित्रपटाचा उल्लेख करताना तिनं 'रूमी की शराफत' या मॅडॉक फिल्म्सच्या चित्रपटाचा उल्लेख केला. शिवाय एक विनोदी चित्रपट हाती असल्याचे सांगताना तिने 'सना' या आगामी चित्रपटाचाही उल्लेख केला, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.