मुंबई : 'पुष्पा 2: द रुल' 4 डिसेंबरच्या प्रीमियर शोदरम्यान थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय या महिलेचा मुलगा यात गंभीर जखमी झाला आहे. या शोदरम्यान अभिनेता अल्लू अर्जुनही हजर होता. एनआयच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितलं की, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियर शोपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी संध्या थिएटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी महिलेचा मृत्यू : या प्रकरणात अडकलेले आरोपी संध्या थिएटरचे मालक एम संदीप (३७), वरिष्ठ व्यवस्थापक एम नागराजू (५१) आणि खालच्या बाल्कनीचे प्रभारी विजय चंद्रा (५३) हे आहेत. ४ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता सिनेप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मध्य विभागाचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दुर्गाबाई देशमुखला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. याशिवाय तिचा मुलगा श्रीतेजवर सध्या उपचार सुरू आहेत. जेव्हा अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसह थिएटरमध्ये पोहोचला. अल्लू अर्जुन आल्याचं समजल्यानंतर लोकांनी थिएटरमध्ये धाव घेतली. त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली होती.
Sandhya Theatre Stampede Tragedy: 3 Arrested for Negligence
— Informed Alerts (@InformedAlerts) December 8, 2024
Three Sandhya 70 mm Theatre staff, including its owner, were arrested over a stampede during the #Pushpa2TheRule premiere on December 4. The incident claimed Revathi (35) and left her son Sritej critically injured. https://t.co/NFBzwqHDM5 pic.twitter.com/HraBVCTYqp
Sandhya Theatre Stampede Tragedy: 3 Arrested for Negligence
— Informed Alerts (@InformedAlerts) December 8, 2024
Three Sandhya 70 mm Theatre staff, including its owner, were arrested over a stampede during the #Pushpa2TheRule premiere on December 4. The incident claimed Revathi (35) and left her son Sritej critically injured. https://t.co/NFBzwqHDM5 pic.twitter.com/HraBVCTYqp
Hyderabad: Tragedy at Pushpa 2 Premiere
— Informed Alerts (@InformedAlerts) December 5, 2024
During the Pushpa 2 premiere at Sandhya Theatre, Hyderabad, Revati (39) from Dilsukhnagar lost her life amid crowd chaos. She collapsed and was rushed to Durgabhai Deshmukh Hospital but could not be saved.#Pushpa2TheRule pic.twitter.com/aM9gwByNwA
संध्या थिएटरच्या मालिकांसह तिघांना झाली अटक : संध्या थिएटर चेंगराचेंगरी दुर्घटनेत निष्काळजीपणाप्रकरणी 3 जणांना अटक झाल्यानंतर, याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. 4 डिसेंबरच्या रात्री संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करून या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. याशिवाय अल्लू अर्जुननेही चेंगराचेंगरी जखमी झालेल्या मुलाच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. 4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमियर शोपूर्वी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये जमले होते. यानंतर याठिकाणी जमावाला नियंत्रणात करण्यात न आल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला होता.
हेही वाचा :
बॉक्स ऑफिसवर 'पुष्पराज'चं राज्य, अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'नं जगभरात गाठला 500 कोटींचा टप्पा
'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जूनसाठी श्रेयस तळपदे, तर फहाद फसिलच्या डबींगसाठी राजेश खट्टरचा आवाज