ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं, अल्लु अर्जुन आणि मंदान्नाच्या डान्स स्टेप्सची प्रेक्षकांना भुरळ - Pushpa 2 Angaaron Lyrical Video - PUSHPA 2 ANGAARON LYRICAL VIDEO

: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेल्या 'पुष्पा - द रुल' चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर वेगात पसरलं आहे. 'श्रीवल्ली' आणि 'पुष्पा' या जोडीचं हे नवं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Pushpa 2 Angaaron Lyrical Video
'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं (rashmika_mandanna instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 12:50 PM IST

मुंबई - Pushpa 2 Angaaron Lyrical Video : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार जोडपं अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना त्यांचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजसाठी पूर्ण तयार आहेत. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाचं टायटल साँग लाँच केलं होतं. हे गाणे रिलीज होताच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. चाहत्यांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित चित्रपटातील या ब्लॉकबस्टर हिट जोडीचं नवं गाणं आज २९ मे रोजी ६ भाषांमध्ये रिलीज केलं आहे.

निर्मात्यांनी बुधवारी 'पुष्पा 2 द रुल'चा दुसरा ट्रॅक 6 भाषांमध्ये रिलीज केला. या गाण्याला प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं आवाज दिला आहे. हे लिरिक्स व्हिडिओ गाणं आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर गाण्याचं नवीन पोस्टर रिलीज केलं आणि लिंक शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'पुष्पाराज आणि श्रीवल्ली यांच्याबरोबर सामील व्हा आणि त्यांच्या सुपर आकर्षक व्हिबवर डान्स करा.'

रश्मिका मंदान्नानं तिच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याचं पोस्टर शेअर करत गाण्याविषयी सांगितलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे गाणं तिच्यासाठी खूप खास आहे, ज्यावर संपूर्ण देश नाचू शकेल याची तिला खात्री वाटते. आपल्या सर्व आप्तजनांसाठीचं हे गाणं असल्याचंही तिनं म्हटलंय.

रश्मिकाने पुढे लिहिले की, 'मला आशा आहे की या गाण्यावर डान्स करताना मला जितका आनंद मिळाला तितकाच तुम्हालाही मिळेल. मी तुमच्यावर प्रेम करते आणि आम्ही तुमच्यासाठी हे गाणं सादर करत आहोत. श्रीवल्ली आणि पुष्पा."

'पुष्पा 2 द रुल'चं युगल गीत 6 भाषांमध्ये झालं रिलीज

निर्मात्यांनी चित्रपटातील हे नवं गाणं 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज केलं आहे. तेलुगुमध्ये 'सुसेकी', हिंदीमध्ये 'अंगारो', मल्याळममध्ये 'कंडालो', कन्नडमध्ये 'नोडोका', तमिळमध्ये 'सूदाना' आणि 'सूदाना' बंगालीमध्ये 'अगुनेर' असं या गाण्याची शीर्षक आहेत.

'पुष्पा-2' 15 ऑगस्टला रिलीज होणार

हे गाणं श्रेया घोषालनं गायलं आहे. संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं आहे आणि गीत चंद्रबोस यांनी लिहिलं आहे. देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेल्या 'द कपल सॉन्ग'चे बोल चंद्र बोस यांनी लिहिले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मायथ्री मूव्ही मेकर्स निर्मित 'पुष्पा 2' चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

  1. 'मिस्टर आणि मिसेस माही' स्क्रिनिंगमध्ये लव्हबर्ड्स खुशी कपूर-वेदांग रैनानं वेधलं लक्ष - Mr and Mrs Mahi
  2. "ऑल आय ऑन रफाह" चळवळीसाठी प्रियांका, रश्मिका ते कीर्तीपर्यंत भारतीय सेलिब्रिटींनी उठवला आवाज - All Eyes On Rafah
  3. विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा नाद सोडा अन् संगीतात रममाण व्हा; 'लिटिल चॅम्पचा' बालमित्रांना सल्ला - Geet Bagde Advice To Child

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.