ETV Bharat / entertainment

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लग्नपत्रिका लीक - लग्नपत्रिका लीक

Pulkit And Kriti Wedding Card : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आता या जोडप्याच्या लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर लीक झालं आहे.

Pulkit And Kriti Wedding Card
पुलकित आणि क्रितीच्या लग्नाची पत्रिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:22 AM IST

मुंबई - Pulkit And Kriti Wedding Card : 'फुक्रे' फेम अभिनेता पुलकित सम्राट सध्या त्याच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. तो अभिनेत्री क्रिती खरबंदाला डेट करत असून तिच्याशी लवकरच लग्न करणार आहे. आता या दोघांच्या लग्नाचे कार्ड लीक झाले आहे. हे लग्नाचे कार्ड सामान्य कार्डपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. व्हायरल झालेलं कार्ड अ‍ॅनिमेशनवर आधारित आहे, ज्यात एक मुलगा बाल्कनीत गिटार घेऊन बसला आहे. याशिवाय तिथे एक मुलगीही बसलेली दिसत आहे. हे दोघेही समुद्राकडे बघताना दिसत आहेत. कार्डमध्ये दोन श्वानही आहेत. या कार्डच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''माझ्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी आता मी प्रतीक्षा करू शकत नाही. लव्ह पुलकित अ‍ॅन्ड क्रिती.''

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाचे फोटो व्हायरल : आता कार्डच्या पोस्टमध्ये चाहते या जोडप्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे 13 मार्चला लग्न करणार आहेत. पुलकित सम्राट बऱ्याच दिवसांपासून क्रिती खरबंदाला डेट करत आहे. अलीकडेच या जोडप्याची एंगेजमेंट झाली आहे. त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आले होते. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये क्रिती खरबंदा आणि पुलकितचे कुटुंब एकत्र दिसत होते. दुसऱ्या एका फोटोमध्ये क्रिती आणि पुलकितची अंगठी दिसत होती. पुलकित सम्राटच्या बहिणीनं ही पोस्ट शेअर करून या जोडप्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता.

पुलकित सम्राटचं वैयक्तिक आयुष्य : यानंतर आणखी एका पोस्टची चर्चा झाली, ज्याच्या कॅप्शनमध्ये 'लेट्स मार्च' असं लिहिलं होतं. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की कदाचित दोघेही मार्चमध्ये लग्न करणार आहेत. सध्या तरी दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मात्र आता लग्नपत्रिकेची झलक व्हायरल होऊ लागली आहे. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न असणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये पुलकितनं गर्लफ्रेंड श्वेता रोहिरासोबत लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नात फार काळ टीकू शकलं नाही. त्यांचा घटस्फोट 2015 मध्ये झाला होता. आता पुलकित आणि क्रिती नवीन सुरूवात करणार आहेत.

हेही वाचा :

  1. प्रतीक गांधी दिव्येंदू अविनाश तिवारी स्टारर 'मडगाव एक्सप्रेस' ट्रेलर प्रदर्शित
  2. अदा शर्मा स्टारर 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चा ट्रेलर झाला रिलीज
  3. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकलेल्या सेलेब्रिटींवर कंगना रणौतचा हल्ला बोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.