मुंबई - अक्षय कुमारचा 'सिंग इज किंग' (2008) बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा अक्षयच्या 'हॅपी सिंग' या पात्रानं प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटामधील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली होती. 'सिंग इज किंग' चित्रपटात प्रेक्षकांना कॉमेडीचं नाहीतर अक्षय आणि कतरिना कैफची रोमँटिक केमिस्ट्री देखील पाहायला मिळाली होती. अलीकडेच 'सिंग इज किंग'चा सीक्वल बनणार असल्याची बातमी समोर आल्यावर लोकांची उत्सुकता खूप वाढली होती. एका रिपोर्टनुसार सीक्वेलमध्ये अक्षय कुमारची जागा रणवीर सिंग नाहीतर दिलजीत दोसांझ येऊ शकतात, असं होत.
अक्षय कुमारशिवाय 'सिंग इज किंग' बनू शकत नाही : मात्र अक्षय कुमारच्या संमतीशिवाय 'सिंग इज किंग 2'मध्ये दुसरा कोणीही हिरो असू शकत नाही, अशी आधीच व्यवस्था अक्षयनं करून ठेवली आहे. निर्माता शैलेंद्र सिंग यांनी अलीकडेच घोषणा केली होती की, ते 'सिंग इज किंग'चा सीक्वेल बनवणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या जागी रणवीर सिंग किंवा दिलजीत दोसांझला कास्ट करणार आहे, अशी बातमी देखील सोशल मीडियावर वाऱ्याप्रमाणे पसरली होती. यानंतर सीक्वेलमध्ये अक्षय नसल्याचं देखील बातमी पसरली होती, यानंतर अनेकजण नाराज झाले होते.
अक्षयकडे 'सिंग इज किंग'चे 50% हक्क: एका रिपोर्टनुसार 'सिंग इज किंग'मध्ये अक्षयच्या जागी दुसऱ्याला कास्ट करणे शक्य नाही, कारण 'सिंग इज किंग'चे 50 टक्के आयपी अधिकार अक्षय कुमारकडे आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर कोणाला याचा पार्ट 2 बनवायचा असेल तर यात अक्षयची देखील संमती लागेल. अक्षय आणि त्याची टीम 'सिंग इज किंग'चे हक्क सोडणार नाही. अक्षय हा चित्रपट तेव्हाच बनवेल, जेव्हा त्याच्याकडे चांगली स्क्रिप्ट असेल. अक्षयच्या टीममधील एका व्यक्तीनं खुलासा केला की, अक्षय 'सिंग इज किंग'चे हक्क, शीर्षक आणि इतर सर्व गोष्टींचा 50% शेअरहोल्डर आहे. याशिवाय अक्षयशिवाय निर्माता शैलेंद्र सिंग यांना 'सिंग इज किंग'चा सीक्वेल, प्रीक्वल आणि फ्रेंचायझी बनवण्याचे अधिकार नाहीत.
'सिंग इज ब्लिंग' हा 'सिंग इज किंग'चा सीक्वेल नाही : 2015मध्ये अक्षय कुमार स्टारर 'सिंह इज ब्लिंग' रिलीज झाला, तेव्हा लोकांना वाटले की हा 'सिंह इज किंग'चा सीक्वेल आहे. मात्र यानंतर अक्षयनं पुष्टी केली होती की, दिग्दर्शक प्रभु देवाचा हा चित्रपट पूर्णपणे वेगळा प्रोजेक्ट आहे, या चित्रपटाचा 'सिंग इज किंग'शी कोणताही संबंध नाही. तसेच अक्षय कुमार 'सिंग इज किंग'मध्ये सहनिर्माताही होता.
हेही वाचा :