मुंबई - EID UL AJAH : देशभरात आज 17 जून रोजी बकरीद ईद साजरी होत आहे. यानिमित्तानं अनेकजण मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. आता बॉलिवूड स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी तिनं 'फादर्स डे'निमित्तानं, तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला होता. यामध्ये निक जोनास आणि मालती यांच्यातील मजबूत बॉन्डिंग दिसत होती. तसेच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्टार्सनं दिल्या बकरीद ईदच्या शुभेच्छा : 'रंगीला' फेम अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं तिच्या एक्सवर सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ता देखील तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा द्यायला विसरली नाही. तिनं आपल्या चाहत्यांना या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जॅकी भगनानी इन्स्टास्टोरीवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सनी देओलनं देखील एक व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस फेम अब्दु रोजिकनं बकरीबरोबरचा त्याचा एक फोटो शेअर केला आहे.
बकरीदला ईद : या फोटोमध्ये तो पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावर त्यानं एक शेला बांधला आहे. याशिवाय त्यानं लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी सनग्लास लावला आहे. या लूकमध्ये खूप तो क्यूट दिसत आहे. अब्दु रोजिक हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपले सुंदर फोटो पोस्ट करून चर्चेत असतो. आता काही दिवसापूर्वीचं त्याचा साखरपूडा झाला आहे. सध्या त्याच्या लग्नाची तारीख समोर यायची आहे. मात्र लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान बकरीद ईद हा सण प्रत्येक मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे. बकरीदला ईद उल अजहा देखील म्हणतात. हा सण रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो. या दिवशी इस्लाम धर्माचे लोक मशिदीत नमाज अदा करतात आणि नंतर प्राण्यांची कुर्बानी देतात.
हेही वाचा :