ETV Bharat / entertainment

'देसी गर्ल' प्रियांकाच्या पती निकनं सर्वांना शांत राहण्याची केली सूचना, मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल - priyanka chopra - PRIYANKA CHOPRA

Priyanka chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास आपल्या मुलीसह मुंबई विमानतळावर आज पहाटे स्पॉट झाले. हे जोडपे लॉस एंजेलिसला रवाना झाले आहे.

Priyanka chopra and Nick Jonas
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 10:05 AM IST

मुंबई -Priyanka chopra and Nick Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमासाठी भारतात आली होती. यानंतर तिनं आपल्या कुटुंबासह बराच चांगला वेळ घालवला. ती श्रीराम मंदिरात दर्शनला अयोध्येला पोहोचली होती. यानंतर तिनं होळीसाजरी केली. तसेच तिनं चुलत बहीण मन्नारा चोप्राच्या वाढदिवसालादेखील हजेरी लावली होती. प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीबरोबर विदेशात रवाना झाले आहेत. प्रियांका 31 मार्चच्या पहाटे मुंबई विमानतळावर दिसली. तिथे निकनं सर्वांना शांत राहण्याचे संकेत दिले. जेणेकरून त्यांची मुलगी झोपेतून उठू नये. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकानं मुलगी मालतीला कडेवर धरले आहे.

प्रियांका आणि निक मुंबई विमातळावर स्पॉट : यावेळी प्रियांका व्हाईट लूकमध्ये होती. तर निक हिरव्या रंगाच्या पॅन्टसह काळ्या टी-शर्टमध्ये दिसला. प्रियांकाचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत प्रियांका आणि निकचं कौतुक करत आहे. आता प्रियांका तिच्या घरी जाण्यासाठी निघाली आहे. ती तिच्या कुटुंबासह लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रियांका चोप्रानं इंस्टाग्रामवर होळीच्या सेलिब्रेशनची झलकही शेअर केली आहे. चोप्रा कुटुंबानं मोठ्या उत्साहात होळी साजरी केली होती. व्हिडिओत मन्नारा प्रियांका आणि निकही ढोलाच्या तालावर खूप नाचले. प्रियांकानं यावेळी भारतातील अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती.

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर फोटो शेअर करत असते. प्रियांका यावेळी बॉलिवूडच्या काही प्रोजेक्ट्समुळे भारतात राहिली होती. प्रियांकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'लव्ह अगेन' आणि 'सिटाडेल'मध्ये दिसली होती. तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर ती 'हेड्स ऑफ स्टेट'चा एक भाग आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये ती दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'जी ले जरा ' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच प्रियांका कल्पना चावला बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. लंडनमधील होप गालामध्ये आलिया भट्टनं गायलं सुंदर गाणं, व्हिडिओ व्हायरल - Alia bhatt
  2. हनी सिंगनं लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना दिला 'गांजा' न पिण्याचा सल्ला - Yo yo honey singh
  3. तब्बू, करीना, कृती स्टारर 'क्रू'ने रचला इतिहास, महिला केंद्रीत चित्रपट म्हणून जमवला आजवरचा सर्वाधिक गल्ला - Crew Creates History

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.