ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं कुटुंबासह 'द ब्लफ'च्या क्रूबरोबर मजेशीर झलक केली शेअर - priyanka share pics and videos - PRIYANKA SHARE PICS AND VIDEOS

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं 'द ब्लफ' सेटवरून काही सुंदर झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या फोटोत आणि व्हिडिओत प्रियांका आपल्या क्रू आणि कुटुंबबरोबर दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा (प्रियांका चोप्रा - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 12:13 PM IST

मुंबई - Priyanka Chopra : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्रानं 'द ब्लफ'चं शूटिंग पूर्ण केलंय. तिनं रविवारी, 11 ऑगस्ट रोजी पहाटे, तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ही झलक शेअर करताना तिनं एक लांबलचक नोट लिहिली आहे, यामध्ये तिनं ऑस्ट्रेलिया ते लंडन असा उल्लेख केला आहे. याआधीही प्रियांका 'द ब्लफ'च्या सेटवरून काही खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केल्या होत्या. आता तिनं शेअर केलेल्या फोटोत आणि व्हिडिओमध्ये ती कुटुंबाबरोबर आणि चित्रपटाच्या क्रूबरोबर एंजॉय करताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रानं शेअर केले फोटो : प्रियांकानं तिची लेटेस्ट पोस्ट शेअर करत लिहिलं, "हे 'द ब्लफ'च्या सेटवरची फोटो आहेत. माझ्या कुटुंबाबरोबर आणि या अद्भुत लोकांबरोबर काम करायला मिळालं हे मी माझ सौभाग्य समजते. हे खरोखरच प्रेम आणि परिश्रम आहे, हे काम आमचे निडर लीडर फ्रेंकी ई फ्लावर्स आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओच्या एकत्र आल्यानंतर शक्य झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रतिभावान कलाकार आणि उत्कृष्ट क्रूबरोबर काम करणं खूप मजेदार होतं." यानंतर तिनं पुढं लिहिलं, "या वर्षी लोकेशन लॉटरीमध्ये मी खरोखर भाग्यवान ठरले, सर्व चांगलं होतं. गोल्ड कोस्ट ते लंडन हा एक वेगळा मार्ग होता, मात्र मी पटकन घरी पोहोचले. हा चित्रपट इथे बनवताना मला जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद घरी जाण्याचाही आहे."

प्रियांका चोप्राची वर्क फ्रंट : 'द ब्लफ'पूर्वी प्रियांकानं 'हेड्स ऑफ स्टेट'चं शूटिंग पूर्ण केलं होतं. यामध्ये ती इद्रिस एल्बा आणि जॉन सीना या कलाकारांबरोबर दिसली होती. प्रियांकाकडे 'सिटाडेल'चा दुसरा सीझनही आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये, चाहते अजूनही आलिया भट्ट आणि कतरिना कैफबरोबरच्या 'जी ले जरा'च्या अपडेटची वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाबाबत कोणतेही माहिती दिलेली नाही. मात्र यापूर्वी प्रियांका जेव्हा भारतात आली होती, तेव्हा ती या चित्रपटाबाबत फरहान अख्तरबरोबर बोलण्यासाठी गेली होती.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्राच्या वाढदिवशी जाणून घ्या तिच्या करिअरबद्दल विशेष गोष्टी... - PRIYANKA CHOPRA
  2. 'द ब्लफ'च्या शूटिंगवर परतली प्रियांका चोप्रा, हातावरील जखम पाहून चाहत्यांना बसला धक्का - Priyanka Chopra
  3. प्रियंका चोप्रापासून ते अनुष्का शर्मापर्यंत बॉलिवूड सुंदरींनी केलीय प्लास्टिक सर्जरी - World Plastic Surgery Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.