ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा निक जोनासची मुलगी मालती मेरीचा बॉल पिटमध्ये खेळतानाचा फोटो व्हायरल - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

Malti Marie : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं आज मालतीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालती बॉल पिटमध्ये मजा करताना दिसत आहे.

Malti Marie
मालती मेरी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 2:23 PM IST

मुंबई - Malti Marie : ग्लोबल आयकॉन स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनासला 2022 मध्ये सरोगसीद्वारे एक मुलगी झाली, जिचं नाव मालती मेरी ठेवलं. आई झाल्यानंतर प्रियांका आणि निकच्या आयुष्यात एक सुंदर वळण आले आहे. प्रियांका अनेकदा तिच्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर करते. आज 18 फेब्रुवारी रोजी प्रियांका चोप्रानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी मालती मेरीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत मालती बॉल पिटमध्ये पाठीवर पडलेली दिसत आहे. या फोटोत ती डोळे मिटून हसत आहे. ब्लॅक अँड व्हाइट बॉल पिटमध्ये पडलेली मालती हिरव्या रंगाच्या पोशाखात खूप क्यूट दिसत आहे.

प्रियांकानं शेअर केला मालती मेरीचा फोटो : आता प्रियांकानं शेअर केलेल्या या फोटोला अनेक पसंत करत आहेत. या फोटोवर प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "तू माझी मस्करी करत आहेस का? मालती मेरी खरोखरच एक चॅम्प आहे. ती मला दररोज आश्चर्यचकित करते. ती धैर्यवान, कृतज्ञ आणि जिज्ञासू आहे." मालती मेरीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आताच काही दिवसापूर्वी मालतीनं तिचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. तिच्या वाढदिवसाचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाले होते. याशिवाय निक देखील मालतीचे सुंदर फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो.

प्रियांका वर्कफ्रंट : प्रियांका आणि निक आपल्या मुलीसह अनेकदा बाहेर फिरायला जात असतात. काही दिवसापूर्वी निक मुंबई लोल्लापलूझा 2024च्या कार्यक्रमात त्याच्या भावांसह आला होता. यावेळी त्यानं रसिकांच खूप मनोरंजन केलं होत. प्रियांका आणि निकनं 1 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केलं होत. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' आणि 'डॉन 3'मध्ये दिसणार आहे. 'डॉन 3'चित्रपटामध्ये तिच्याबरोबर रणवीर सिंग असणार आहे. याशिवाय ती कल्पना चावला बायोपिकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी पोहोचले गोव्यात; विमानतळावरील व्हिडिओ झाला व्हायरल
  2. हिना खान आणि मुनावर फारुकी स्टारर 'हल्की-हल्की सी' गाण्याच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर
  3. कार्तिक आर्यन लग्नासाठी तयार! त्याच्या लेटेस्ट फोटोच्या कॅप्शनमुळे फिमेल फॅन्स अस्वस्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.