ETV Bharat / entertainment

पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 10:12 AM IST

Updated : Apr 5, 2024, 10:43 AM IST

Prithviraj Sukumaran : 'आदुजीविथम- द गोट लाइफ' चित्रपट ऑस्कर पुरस्कार मिळवणारा असल्याचं इस्त्रोचं शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी म्हटलंय. यामधील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यानं ही व्यक्तीरेखा खरोखर जगली असल्याचं सांगत त्याच्या अभिनयाचंही कौतुक केलंय.

Prithviraj Sukumaran
पृथ्वीराज सुकुमारन

मुंबई - Prithviraj Sukumaran : दाक्षिणात्य चित्रपटांनी सवंग लोकप्रिय चित्रपटाबरोबरच वास्तववादी, कलात्मक आणि आशयघन चित्रपटांची कास नेहमीच धरली आहे. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमध्ये असे असंख्य चित्रपट नियमित बनत असतात. 'कांतारा', '2018 : एव्हरी वन इज हिरो', 'सुपर डिलक्स', 'उप्पेना', 'कलर फोटो', 'पेरियरम पेरुमल', 'जय भीम' अशा चित्रपटांनी पुरस्कारासह प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत. अलिकडे रिलीज झालेला 'आदुजीविथम- द गोट लाइफ' हा चित्रपट त्याच्या भावनाप्रधान कथानकासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जात आहे. यातील पृथ्वीराज सुकुमारनच्या अभिनयाची तुलना जागतिक स्तरावर केली जात असून त्याला भरपूर प्रशंसा मिळत आहे.

अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याच्या अभिनयाचं कौतुक इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते नंबी नारायणन यांनीही केलंय. 'आदुजीविथम- द गोट लाइफ' चित्रपटातील पृथ्वीराजचा अभिनय ऑस्कर पुरस्कारायोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार मिळवेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

इंस्टाग्रामच्या माध्यमातून शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी पृथ्वीराज सुकुमारनच्या अभिनयाचं कौतुक करताना म्हटलंय,"हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, त्यांनी त्याचं काम अत्यंत चांगलं केलं आहे. मला पृथ्वीराजचा उल्लेख करायलाच हवा. त्यानं या चित्रपटात त्याच्या अभिव्यक्तीनं जीवनाशी जोडलं आहे. सगळा भूतकाळ त्यानं या चित्रपटात मागं टाकलाय. मला खात्री वाटते की या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकेल. ऑल द बेस्ट!"

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

"आदुजीविथम - द गोट लाइफ" चित्रपटामधील पृथ्वीराज सुकुमारनच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांना खूप प्रभावित केलंय. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत 40.40 कोटींची कमाई करत हा मल्याळम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीला 16 वर्षे लागली आहेत. या चित्रपटाची संकल्पना सुरुवातीला ब्लेसीने 2008 मध्ये मांडली होती. तेव्हापासून अभिनेता सुकुमारन यानं अभिनय करण्याची संमती दर्शवली आणि चित्रपटासाठीची तयारी सुरू केली होती.

या चित्रपटात सुकुमारननं नजीब मुहम्मद या एका भारतीय स्थलांतरित कामगाराची व्यक्तीरेखा साकारली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव आणि माणसं सोडून मध्यपूर्वेत गेलेल्या व्यक्तीच्या खऱ्या जीवनातील जीवनातील घटनेवरुन प्रेरित आहे. त्याच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं आणि तो वाळवंटात शेळ्या पाळताना आढळतो.

हेही वाचा -

  1. 'वाळवी' च्या प्रचंड यशानंतर परेश मोकाशी घेऊन येताहेत ‘नाच गं घुमा’! - Paresh Mokashi Movie
  2. 'मी जिंवत असेपर्यत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नाही', बोनी कपूरचा निर्धार - SRIDEVI BIOPIC
  3. चित्रपटांप्रमाणेच राजकारणसुद्धा 'वेट अन्ड वॉच'चा गेम, सई ताम्हणकरचे साई दर्शनानंतर उद्गार - Sai Tamhankar visit Sai Mandir

Last Updated : Apr 5, 2024, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.