ETV Bharat / entertainment

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरी होईल छोट्या पाहूण्याचं आगमन, केली पोस्ट शेअर - yuvika chaudhary pregnancy - YUVIKA CHAUDHARY PREGNANCY

Prince Narula Yuvika and Chaudhary : प्रिन्स नरुलानं युविका चौधरीच्या प्रेग्नेंसीची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केली आहे. आता अनेकजण या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Prince Narula and  Yuvika Chaudhary
प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी ((फाइल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 12:19 PM IST

मुंबई - Prince Narula Yuvika and Chaudhary : 'बिग बॉस 9' चे लोकप्रिय कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी त्यांच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. प्रिन्सची पत्नी युविका गरोदर असल्याची घोषणा त्यानं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर या जोडप्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. गेल्या मंगळवारी 25 जून रोजी प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर ही बातमी झपाट्यानं सोशल मीडियावर पसरली. एका फोटोसह त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "सर्वांना नमस्कार, मला माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे समजत नाही. कारण आम्ही खूप आनंदी आहोत, त्याचबरोबर मी नर्व्हसही आहे."

प्रिन्स नरुलानं केली घोषणा : यानंतर त्यानं पुढं लिहिलं, "देवाचा मी आभारी आहे आणि पालक बनण्यासाठी खूप उत्साही आहे, कारण प्रविका बाळ लवकरच येणार आहे. आता त्याच्यासाठी सर्व काही केलं जाईल. युविका चौधरी तू दुसऱ्या क्रमांकावर येशील. मी माझ्या आई- वडिलांसाठी देखील दुसऱ्या क्रमांकावर येईल. कारण जे आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असणार आहे, ते येणार आहे. ज्याच्यासाठी मी इतकं केलं, खूप मेहनत केली. मी जेव्हाही बाप झालो तेव्हा सर्व काही त्याच्यासाठी करेल, असं सर्व पालकांना वाटते. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला मोठे केले आहे आणि चांगले व्यक्ती बनले. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक क्षण खूप खास भावनांनी जगणं, रडणं आणि घरी आल्यावर त्याबद्दल बोलणं हे होणार आहे. देवाचे आभार मानतो, ज्यानं हा आनंद दिला."

प्रिन्स आणि युविकाची प्रेमकहणी : प्रिन्स आणि युविका पहिल्यांदाच 'बिग बॉस 9'मध्ये भेटले होते. हे दोघींही या शोमध्ये एकामेंकाच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये एंगेजमेंट केली आणि त्याच वर्षी नंतर लग्न केलं. दरम्यान युविका चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'ओम शांती ओम', 'तो बात पक्की' आणि 'समर 2007' अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. दुसरीकडे प्रिन्स नरुलानं 'एम टीव्ही रोडीज 12', 'एम टीव्ही स्प्लिट्सविला 8', 'बिग बॉस 9' आणि 'नच बलिये 9' हे रिॲलिटी टीव्ही शो जिंकले आहेत.

हेही वाचा :

  1. क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं केलं कौतुक - chandu champion
  2. झहीर इक्बालनं पत्नी सोनाक्षी सिन्हाला गिफ्ट केली बीएमडब्लू आय 7 कार - Zaheer Iqbal and Sonakshi Sinha
  3. 'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.