ETV Bharat / entertainment

Prabhas Returns : 'कल्की 2898 एडी'च्या शुटिंगनंतर प्रभास इटलीहून मायदेशी परतला, पाहा त्याचा स्टायलिश लूक - Prabhas Returns to Hyderabad

Prabhas Returns to Hyderabad : प्रभास त्याच्या आगामी कल्की 2898 एडी चित्रपटाच्या शुटिंगसाठी इटलीला गेला होता. या ठिकाणी गाण्याचे शुटिंग केल्यानंतर तो आता हैदराबादला परतला आहे. काळ्या रंगाची हुडी, कुर्ता आणि हिरवी पँट असा त्याचा एअरपोर्ट लूक साधा पण स्टायलिश दिसत होता.

Prabhas Returns to Hyderabad
प्रभास इटलीहून मायदेशी परतला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 2:47 PM IST

मुंबई - Prabhas Returns to Hyderabad : 'बाहुबली' स्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. नुकताच चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिशा पटानी आणि इतर क्रू सदस्यांसह इटलीला रवाना झालेला अभिनेता प्रभास हैदराबाद शहरात परतला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' ही एक सायन्स फिक्शन असलेला नाट्यमय चित्रपट आहे. हा चित्रपटा 9 मे 20224 रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

काल प्रभास इटलीहून मायदेशी परतला. या ठिकाणी तो चित्रपटासाठी गाण्याचे शुटिंग करत होता. इंस्टाग्रामवर पापाराझी हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता हैदराबाद विमानतळावर काळ्या रंगाची हुडी, काळा कुर्ता आणि हिरवी पँट परिधान केलेला दिसत होता. या ड्रेमध्ये त्याचा एअरपोर्ट लूक साधा पण स्टायलिश दिसत होता.

'कल्की 2898 एडी' हा दिग्दर्शक नाग अश्विनचा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, पशुपती, प्रभास आणि दिशा पटानी यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकार आहेत. यामध्ये प्रभासने भैरव नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे आणि चित्रपटाची कथा महाभारत काळापासून ते सन 2898 पर्यंत 6000 वर्षे व्यापलेली आहे. निर्मात्यांनी कमल हासनला चित्रपटातील खलनायकाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार केले आहे.

वैजयंती मूव्हीजच्या बॅनरखाली सी आसवानी दत्त यांनी बनवलेला 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाला संतोष नारायणन यांचे संगीत आहे. जोर्डजे स्टोजिल्जकोविक हे सिनेमॅटोग्राफर आहेत आणि कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी याचे संकलन सांभाळले आहे.

'कल्की 2898 एडी' नंतर, प्रभास 'द राजा साब' नावाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिग्दर्शक दसरी मारुतीसोबत काम करणार आहे. हा चित्रपट 2025 च्या संक्रांती दरम्यान मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त, 2024 च्या उत्तरार्धात शुटिंग सुरू होणार असलेल्या 'स्पिरिट' या चित्रपटासाठी प्रभास 'अ‍ॅनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगासोबत काम करणार आहे.

हेही वाचा -

  1. Tiger 3 World Tv Premiere : 'टायगर 3'चा होणार वर्ल्ड टीव्ही प्रीमियर , पाहा 'या' दिवशी चित्रपट
  2. ISPL Final: अमिताभ बच्चनने गाठले थेट क्रिकेटचे मैदान! 'आयएसपीएल' अंतिम सामन्याला हजेरी
  3. Aamir Khan breakfast with media : ब्रेकफास्टचे निमंत्रण देऊन आमिर खाननं मीडिया सहकाऱ्यांसोबत मारल्या गप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.