ETV Bharat / entertainment

'पोचर' भारताचा नंबर 1 शो, मालिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आलिया भट्टची प्रतिक्रिया - पोचर

'पोचर' या मालिकेला मिळालेल्या प्रेमाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने शनिवारी इंस्टाग्रामवर तिचा उत्साह व्यक्त केला. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या मालिकेची आलिया भट्टने कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 5:04 PM IST

मुंबई - चित्रपट दिग्दर्शक रिची मेहताची 'पोचर' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतील उतरताना दिसत आहे. या मालिकेची निर्मिती आलिया भट्टने केली आहे. 'पोचर' मालिका 23 फेब्रुवारी रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे. माफक प्रमोशन असूनही, शो त्याच्या आकर्षक कथानक आणि अनुकूल प्रतिसादामुळे मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता, रिलीजच्या एका दिवसानंतर, आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया हँडलवर मालिकेला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला.

इंस्टाग्रामवर आलिया भट्टने तिच्या मांजरीला धरून चुंबन घेतानाचा स्वतःचा एक फोटो टाकला आहे. तिच्या मागे पोचर या नव्याने रिलीज झालेल्या मालिकेचे सर्व एपिसोड स्ट्रिमिंग होत असल्याचे फोटोत दिसत आहे.

मालिकेच्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आलियाने तिचा उत्साह आणि कृतज्ञता शेअर केली. मालिका रिलीज झाल्यानंतर एका दिवसात, पोचर भारतात प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याचे तिने निदर्शनास आणून दिले. तिने लिहिले, "रिलीज झाल्यानंतर एका दिवसातच, पोटर भारतात नंबर 1 बनला आहे! मिळालेल्या प्रेमासाठी खूप रोमांचित आणि उत्साहित! ज्यांनी अद्याप पाहिले नाही त्यांच्यासाठी प्राईम व्हिडिओवर आता पहा."

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेती चित्रपट निर्माती रिची मेहता दिग्दर्शित, 'पोचर' ही मालिका केरळच्या जंगलात हत्तींच्या दुःखद कत्तलीचा पर्दाफाश करते. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकार नेटवर्कला उघडे पाडण्याच्या उद्दोशाने कार्यरत झालेल्या टीमच्या मिशनचे कथा यात दिसते. कलाकारांमध्ये निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आलिया भट्ट कामाच्या आघाडीवर सध्या वासन बालाच्या जिगरा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतली होती. या चित्रपटाचीही ती करण जोहरसोबत सह-निर्मिती म्हणून काम करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सिंगापूरमध्ये सुरू होते. अलिकडेच हे शूटिंग संपवून आलिया भट्ट भारतात परतली आहे. रॉकी और रॉनी की प्रेम कहानी या चित्रपटात ती अलिकडेच झळकली होती. यामध्ये ती अभिनेता रणवीर सिंगसह अभिनय करताना दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

हेही वाचा -

  1. खुशी कपूरने श्रीदेवीची सहावी पुण्यतिथी एका हृदयस्पर्शी आठवणीसह केली साजरी
  2. कथित लव्हबर्ड्स रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची आशिष रेड्डीच्या रिसेप्शनला स्टाईलमध्ये एन्ट्री
  3. शाहरुखची कन्या सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली ९.५ कोटी रुपयांची जमीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.