मुंबई - PHULE NEW MOTION POSTER : समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त 'फुले' टीमच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. नवीन पोस्टरमध्ये मुख्य अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल दिसत आहेत. या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची भूमिका प्रतीक करत असून पत्रलेखा ही त्यांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे आज समाजात महिलांना मुक्तपणे शिक्षण घेता येतय. या नव्या युगाची सुरुवात करणारे, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी महिला शिक्षणाचं महत्व समाजाला पटवून दिलय.
'फुले' चित्रपटाबद्दल अनंत महादेवननं व्यक्त केल्या भावना : 'फुले' या चित्रपटाविषयी बोलताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी म्हटलं, "महात्मा ज्योतिबा फुले यांनी जात आणि लिंगभेदाविरुद्ध लढा दिला, जो दुर्दैवानं आजही कायम आहे. आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संभाषण पुन्हा सुरू करणं हे माझं ध्येय आहे." याशिवाय याआधी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योतिराव फुले यांना आदरांजली वाहात म्हटलं होत की, "शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांनी समाजावर अमिट छाप सोडली आहे. आज आम्ही थोर महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. एक द्रष्टा समाजसुधारक ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि समानता आणण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं."
'फुले' चित्रपटाची स्टारकास्ट : पुढं त्यांनी म्हटलं, "त्यांच्या कल्पना लाखो लोकांना प्रेरणा देतात. शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी आज समाज घडला आहे. गरीब आणि उपेक्षितांना सशक्त बनवण्याचं त्यांचं व्हिजन पूर्ण करण्याची ही एक संधी आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक गांधी आणि पत्रलेखा व्यतिरिक्त जीत रायदत्त, सुशील पांडे, विशाल अर्जुन, विशाल तिवारी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. या चित्रपटाकडून प्रतीकला खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :